लाचखोर आयकर अधिकाऱ्यांवर सीबीआयने मुंबईत केली कारवाई; १५ लाख स्वीकारताना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:34 PM2021-04-09T20:34:06+5:302021-04-09T20:35:21+5:30
CBI ARRESTS TWO INSPECTORS OF INCOME TAX : हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई करत १५ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आयकर विभागात कार्यरत असलेल्या दोन निरीक्षकांना सीबीआयच्या पथकाने १५ लाखांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. हे दोन्ही अधिकारी मुंबईतील बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात कार्यरत होते.
सीबीआयने आयकर विभागातील तीन निरीक्षकांच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी बलार्ड पियर येथील आयकर कार्यालयात काम करतात. आयकर विभागामार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीत तक्रारदारास मदत करण्यासाठी या तिघांनी 15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लाचेची रक्कम ठरल्याप्रमाणे आयकर विभागातील हे अधिकारी लाच स्वीकारण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे सीबीआयने सापळा रचला होता. त्यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीबीआयने रंगेहाथ पकडले. तसेच ५ लाख रुपये रोख तक्रारदाराकडून जप्त करण्यात आले आहेत. सीबीआय ही कारवाई करत असताना एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.