बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:11 PM2020-06-17T16:11:46+5:302020-06-17T16:16:22+5:30
जवळपास ५७.२६ कोटींचा चुना या कंपन्यांनी बॅंकेला लावला आहे.
सीबीआयने मुंबईस्थित दोन खाजगी कंपन्यांसह व्यवस्थापकीय महासंचालक, संचालक आणि इतर अज्ञात इसमांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जवळपास ५७.२६ कोटींचा चुना या कंपन्यांनी बॅंकेला लावला आहे.
CBI registers case against 2 Mumbai based private companies & others including MD, Directors of private company & unknown others on the allegations of cheating Bank of India to the tune of approximately Rs 57.26 crore: Central Bureau of Investigation pic.twitter.com/kkVufTnB8w
— ANI (@ANI) June 17, 2020
सन २०१३ ते २०१८ दरम्यानच्या काळात मुंबईतील खासगी ओव्हरसीज कंपनीचे एमडी आणि अज्ञात लोकांचा बँक ऑफ इंडियाची फसवणूक करण्याच्या कटात सहभाग आहे. यामध्ये बँक ऑफ इंडिया, मिड कॉर्पोरेट शाखा, फोर्ट, मुंबई येथे फसवणूक करण्यात आली. एफबी पर्सेज / फॉरेन बिल्स निगोशिएशन लि. आणि एक्स्पोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लि.चा फायदा घेऊन जवळपास ६० कोटी खाजगी कंपन्यांनी मंजूर करून घेतले. नंतर आरोपी असलेल्या कंपन्यांनी मंजूर झाल्यानंतर मिळालेला फंड बोगस कागदपत्रे बनवून दुसरीकडे वळविला. त्यामुळे बँक ऑफ इंडियाला ५७.२६ कोटींचा फटका बसला.
बँक ऑफ इंडियाची जवळपास 57.26 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सीबीआयने मुंबईतील दोन खासगी कंपन्यांसह एमडी, खासगी कंपनीचे संचालक आणि इतर अज्ञात इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2020
मुंबईत खासगी कंपन्यांसह आरोपींच्या निवासीस्थानी आणि कार्यालयात सीबीआयने छापे टाकले आहेत. या छाप्यात मालमत्ता, कर्ज, बँक खात्याचे तपशील आणि लॉकर की यासह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक
बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर देशभरात चर्चा, SCनंही मानसिक आजाराबाबत केला सवाल
लिपिकाचा प्रताप, महापालिकेत सव्वा तीन लाखाची अफरातफर