सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 07:35 PM2019-10-03T19:35:04+5:302019-10-03T19:38:57+5:30

गोवा आयआयटी संचालकाविरुध्द बेहिशोबी मालमत्ता प्रकरण फाइलबंद

CBI pauses inquiry due to lack of strong evidences | सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम

सबळ पुराव्यांअभावी सीबीआयकडून चौकशीला विराम

Next
ठळक मुद्देमिश्रा यांच्या नावावर मुंबईत असलेला फ्लॅट त्यांनी कानपूर आयआयटीकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला आहे. मी काहीहगैर केले नव्हते. कोणतेही पुरावे न मिळाल्याने प्रकरण फाइलबंद करावे लागले, असे मिश्रा म्हणाले. 

पणजी - गोवा आयआयटीचे संचालक बी. के. मिश्रा यांच्याविरुध्दचे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण सीबीआयने पुराव्यांअभावी तब्बल दोन वर्षांनी फाइलबंद केले. चौकशीअंती कोणतेही पुरावे न सापडल्याने भुवनेश्वर सीबीआय कोर्टात हे प्रकरण फाइलबंद करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज सीबीआयने सादर केला आहे.
मिश्रा यांच्या नावावर मुंबईत असलेला फ्लॅट त्यांनी कानपूर आयआयटीकडून कर्ज घेऊन खरेदी केलेला आहे. भुवनेश्वर येथे त्यांचे दोन भूखंड आहेत ते आयएमएमटीच्या सेवेत येण्याआधी त्यांनी घेतलेले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल न्यायमूर्ती जी. सी. बेहरा यांनी स्वीकारला असून चौकशीच्या दरम्यान जे दस्तऐवज सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते ते परत करण्यास बजावले आहे.
मिश्रा यांनी भुवनेश्वर येथील आयआयटीमध्येही काम केले आहे त्यानंतर ते गोवा आयआयटीत संचालक म्हणून आले. मिश्रा यांनी यावर प्रतिक्रिया देताना सीबीआयने चौकशी केली याचे आपल्याला दु:ख नाही मात्र मिडियाने ज्या पध्दतीने वृत्तं दिली त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचल्याचे म्हटले आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी आपले कामगिरी चोख बजावली. मी काहीही गैर केले नव्हते. कोणतेही पुरावे न मिळाल्याने प्रकरण फाइलबंद करावे लागले, असे मिश्रा म्हणाले. 

Web Title: CBI pauses inquiry due to lack of strong evidences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.