कॉर्डिलियाप्रकरणी सॅम डिसोझाची सीबीआय चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:37 AM2023-06-21T08:37:17+5:302023-06-21T08:37:37+5:30
यात मुख्य आरोपी एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे असून सॅम डिसोझा हा आरोपी क्रमांक ५ आहे.
मुंबई : कॉर्डिलियो क्रूझवरील छापेमारीनंतर अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला या प्रकरणात न अडकविण्यासाठी २५ कोटी रुपयांच्या कथित खंडणी आरोप प्रकरणातील आरोपी सॅनव्हिल ऊर्फ सॅम डिसोझा याची मंगळवारी सीबीआयने दिल्लीत चौकशी केल्याचे समजते. यात मुख्य आरोपी एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे असून सॅम डिसोझा हा आरोपी क्रमांक ५ आहे.
या छापेमारी दरम्यान आर्यन खान याला अटक केल्यानंतर डिसोझा याने शाहरूख खान याच्या मॅनेजरशी संपर्क साधत पैशांच्या देवाणघेवाणीची चर्चा केली होती, असा आरोप सीबीआयने त्याच्यावर ठेवला आहे. या प्रकरणामध्ये २५ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न आरोपी करत होते.