Kolkata Case : "त्या रात्री डिनरदरम्यान काय झालं, तिला शेवटचं कोणी पाहिलं?"; CBI चा डॉक्टरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:41 PM2024-08-17T12:41:38+5:302024-08-17T13:02:17+5:30

Kolkata Murder Case : केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंत त्यांनी ट्रेनी डॉक्टरच्या तीन सहकारी डॉक्टरांची चौकशी केली आहे.

cbi probe update in kolkata murder case questioned three of victim fellow doctors | Kolkata Case : "त्या रात्री डिनरदरम्यान काय झालं, तिला शेवटचं कोणी पाहिलं?"; CBI चा डॉक्टरांना सवाल

Kolkata Case : "त्या रात्री डिनरदरम्यान काय झालं, तिला शेवटचं कोणी पाहिलं?"; CBI चा डॉक्टरांना सवाल

कोलकाता येथील एका सरकारी रुग्णालयात ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेवरून देशभरात निदर्शनं सुरू आहेत. याच दरम्यान सीबीआयचा तपासही सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंत त्यांनी ट्रेनी डॉक्टरच्या तीन सहकारी डॉक्टरांची चौकशी केली आहे.

गुन्हा घडला त्या रात्रीविषयी त्यांच्याकडे काय माहिती आहे, त्या आधारे या डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. तसेच जेव्हा त्यांनी तरुणीसोबत डिनर केला तेव्हा नेमकं काय झालं हे देखील सहकारी डॉक्टरांना विचारण्यात आलं. त्या रात्री तिला शेवटचं कोणी पाहिलं होतं हाही प्रश्न विचारला. सीबीआयने सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. 

सुपरवायजरसह दहा जणांना समन्स 

सीबीआयने गुन्हा घडला त्यादिवशी ड्यूटीवर असलेल्या आरजी कार रुग्णालयाच्या सिक्योरिटी सुपरवायजरसह दहा जणांना समन्स बजावले आहे. याशिवाय घटनेच्या रात्री ड्युटीवर असलेल्या काही गार्डसनाही बोलावलं आहे. सीबीआयने ड्युटी रोस्टरसह सुपरवायजरला समन्स बजावला आहे जेणेकरून कोणत्या मजल्यावर कोण ड्युटीवर होतं हे कळू शकेल.

संदीप घोष त्या रात्री कुठे होते? 

यापूर्वी रुग्णालयाने निलंबित केलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सीबीआयने शुक्रवारी दुपारी माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांची बराच वेळ चौकशी केली. घोष शुक्रवारी दुपारी ३ वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. घोष यांना सीबीआयने आज पुन्हा समन्स बजावले. तपास यंत्रणेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला की संदीप घोष त्या रात्री कुठे होते? त्याचे म्हणणे इतरांच्या वक्तव्याशी जुळतं की नाही, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.

सेमिनार हॉलमध्ये आढळला मृतदेह 

कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करण्यात आला होता. सेमिनार हॉलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या.

रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा 

या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे, जो पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडे सोपवला होता. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पीडितेचा गळा आवळून खून केल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वी तिच्यावर बलात्कारही झाला. आरोपीने दोनदा तिचा गळा आवळून खून केला. पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. 
 

Web Title: cbi probe update in kolkata murder case questioned three of victim fellow doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.