सीबीआयची छापेमारी; १९ राज्यात ११० ठिकाणी धाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 09:17 PM2019-07-09T21:17:27+5:302019-07-09T21:19:04+5:30

भ्रष्टाचार आणि हत्यारांची तस्करीसह 30 वेगवेगळ्या प्रकरणांसाठी या धाडी घालण्यात आल्या आहेत. 

CBI raids; 110 places in 19 states raid by CBI | सीबीआयची छापेमारी; १९ राज्यात ११० ठिकाणी धाडी 

सीबीआयची छापेमारी; १९ राज्यात ११० ठिकाणी धाडी 

Next
ठळक मुद्दे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज १९ राज्यांमध्ये ११० ठिकाणी धाडी घातल्या आहेत.वेगवेगळ्या ३० प्रकरणांमध्ये अनेक फर्म्स, प्रमोटर्स, कंपनी, संचालक आणि  बँक अधिकारी आदी  लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज १९ राज्यांमध्ये ११० ठिकाणी धाडी घातल्या आहेत. भ्रष्टाचार आणि हत्यारांची तस्करीसह 30 वेगवेगळ्या प्रकरणांसाठी या धाडी घालण्यात आल्या आहेत. 

वेगवेगळ्या ३० प्रकरणांमध्ये अनेक फर्म्स, प्रमोटर्स, कंपनी, संचालक आणि  बँक अधिकारी आदी  लोकांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी मुंबई, नवी दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या शहरांमध्ये केली गेली आहे. याअगोदर २ जुलै रोजी केलेल्या कारवाईत १२ राज्यांमधील ५० शहरांतील ५० वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईत १६ बँक घोटाळ्यातील प्रकरणांचा समावेश होता. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार  दिल्ली, जम्मू, श्रीनगर, जयपूर, गोवा, ओडिसा, आंध्र प्रदेश,  मुंबई, लुधियााना, ठाणे,  भोपाळ, सूरत, कोलार, वलसाड, पुणे, पलनी, गया, गुरुग्राम, चंदिगडसह अन्य अनेक ठिकाणी सीबीआय धाडी टाकल्या आहेत. 



 

Web Title: CBI raids; 110 places in 19 states raid by CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.