बासमती राईस लि.च्या ठिकाणांवर सीबीआयच्या धाडी; कॅनरा बँकेची १७४ कोटी रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 04:44 IST2020-07-04T04:44:06+5:302020-07-04T04:44:17+5:30
कंपनी आणि त्यांच्या संचालकांवर कॅनरा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बासमती राईस लि.च्या ठिकाणांवर सीबीआयच्या धाडी; कॅनरा बँकेची १७४ कोटी रुपयांची फसवणूक
नवी दिल्ली : कॅनरा बँकेची १७४.८९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब बासमती राईस लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांच्या ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या.
कंपनी आणि त्यांच्या संचालकांवर कॅनरा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंजाबच्या अमृतसरमध्ये कंपनी कार्यालय आणि आरोपी संचालक कुलविंदरसिंह मखानी, जसमित कौर आणि मनजितसिंह मखानी यांच्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.
काय आहे आरोप?
सीबीआयचे प्रवक्ते आर.के. गौडा यांनी सांगितले की, तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी कॅनरा बँकेच्या नेतृत्वातील समूह आंध्रा बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, आयडीबीआय बँक, युको बँक यांची
350.84 कोटी रुपयांची फसवणूक केली. यात कॅनरा बँकेच्या १७४.८९ कोटी रुपयांचाही समावेश आहे.