सुशांतप्रकरणी कूपरमधील डॉक्टरची सीबीआयकडून पुन्हा कसून चौकशी, वैद्यकीय अहवालाची एम्स रुग्णालय करणार पडताळणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:11 PM2020-08-24T21:11:05+5:302020-08-24T21:14:34+5:30

Sushant Singh Rajput Suicide case : एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. 

CBI re-investigates Cooper's doctor in Sushant case, AIIMS to verify medical report | सुशांतप्रकरणी कूपरमधील डॉक्टरची सीबीआयकडून पुन्हा कसून चौकशी, वैद्यकीय अहवालाची एम्स रुग्णालय करणार पडताळणी  

सुशांतप्रकरणी कूपरमधील डॉक्टरची सीबीआयकडून पुन्हा कसून चौकशी, वैद्यकीय अहवालाची एम्स रुग्णालय करणार पडताळणी  

Next
ठळक मुद्दे सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहेसीबीआयचे एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे जाऊन तपासणी केली. या ठिकाणी सुशांत हा रिया चक्रवर्तीसह दोन महिने थांबला होता.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराकडे पुन्हा कसून चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे सुशांतचे वैद्यकीय अहवाल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. 


सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्यात सर्व प्रथमदर्शनी साक्षीदाराचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, घरातील नोकर नीरज सिंग, दीपक सावंत यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टराचा पुन्हा सोमवारी जबाब नोंदविण्यात आला. पोस्टमॉर्टेम लवकर करून देण्याबाबत मुंबई पोलिसांनी कोणत्या सूचना केल्या होत्या, पोस्टमॉर्टेम करताना कोणती खबरदारी घेतली, कोविड-19 रिपोर्ट चाचणी घेतली का?, याबाबत डॉक्टराकडून सखोल माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टेम करताना त्याच्या  व्हिडीओ शुटिंग, वैद्यकीय अहवालाच्या प्रती पथकासमवेत असलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्टने  ताब्यात घेतल्या, त्या पुन्हा तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या बोर्डाकडे पाठविण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.


दरम्यान, सीबीआयचे एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे जाऊन तपासणी केली. या ठिकाणी सुशांत हा रिया चक्रवर्तीसह दोन महिने थांबला होता. याठिकाणी 22 व 23 नोव्हेंबरला त्याने आध्यात्मिक रोग बरे करणाऱ्या बाबाला बोलाविल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी क्लबच्या प्रशासनाकडून सुशांतचे तेथील वास्तव्य, त्याच्याशी केलेला आर्थिक व्यवहार, वर्तणूक आदीबाबत जबाब घेऊन कागदपत्रे ताब्यात घेतली.  

आर्थिक बाबींची पडताळणी सुरु
सीबीआयने सुशांत सिहची बँक खाती, ठेवी,  आर्थिक व्यवहार आणि आयटीआरसंबधी कागदपत्रे मुंबई पोलीस व ईडीकडून मागवून घेतली आहेत. त्याचबरोबर त्याच्या सीएला चौकशीसाठी समन्स पाठविले असून मंगळवारी त्याची, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्याकडे चोकशी केली जाणार असल्याचे समजते.

सीबीआयकडून सुशांत सिंह मृत्यूसंबधी सर्व संबधितांचे जबाब, चौकशी आणि पंचनामे करण्यात येत आहेत. ते  पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबाकडे तपास वळविला जाईल. त्यांना चौकशीसाठी पथक उतरलेल्या डीआरओच्या गेस्ट हाऊसमध्ये पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रिया किंवा तिच्या कुटूंबियांना चौकशीसाठी सीबीआयकडून कोणतेही समन्स बजाविण्यात आलेले नाही, असे तिच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.  

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

 

'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

Web Title: CBI re-investigates Cooper's doctor in Sushant case, AIIMS to verify medical report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.