पैशांचा पाऊस! निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी CBI चा छापा; सापडला नोटांचा ढीग, 38 कोटी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 04:29 PM2023-05-04T16:29:50+5:302023-05-04T16:35:56+5:30

सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माजी सीएमडीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त केले होते. त्यांच्या घरातून आतापर्यंत 38 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

cbi recover 38 crore cash wapcos former cmd rajendra kumar gupta arrested | पैशांचा पाऊस! निवृत्त अधिकाऱ्याच्या घरी CBI चा छापा; सापडला नोटांचा ढीग, 38 कोटी जप्त

फोटो - आजतक

googlenewsNext

सीबीआयने वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या घरातून 38 कोटी रुपये जप्त केले आहेत. यानंतर राजेंद्र कुमार गुप्ता आणि गौरव सिंघल याला अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माजी सीएमडीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त केले होते. त्यांच्या घरातून आतापर्यंत 38 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय दागिने आणि सर्व कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. एवढी मोठी रोकड जप्त केल्यानंतर राजेंद्र कुमार गुप्ता आणि गौरव सिंघल यांना सीबीआयने अटक केली आहे.

आतापर्यंत 38.5 कोटींची रोकड जप्त

वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस इंडिया लिमिटेड (WAPCOS) भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. सीबीआयने WAPCOS चे माजी CMD राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सुमारे 38.5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

दिल्ली, गुरुग्रामसह 19 ठिकाणी छापे 

एएनआयच्या म्हणण्यानुसार, सीबीआयने मंगळवारी दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह माजी अधिकाऱ्याशी संबंधित असलेल्या 19 ठिकाणी छापे टाकले. तपास यंत्रणेने मंगळवारी गुप्ता यांच्या लपवून ठेवलेल्या 20 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cbi recover 38 crore cash wapcos former cmd rajendra kumar gupta arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.