सीबीआयने जप्त केली वाघ, बिबट्यांची २६ नखे; तस्करीप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 09:58 AM2022-07-19T09:58:09+5:302022-07-19T09:58:47+5:30

दिल्ली आणि राजस्थान येथून वाघ आणि बिबट्या यांच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती.

cbi seized 26 claws of tiger and leopard three arrested in smuggling case | सीबीआयने जप्त केली वाघ, बिबट्यांची २६ नखे; तस्करीप्रकरणी तिघांना अटक

सीबीआयने जप्त केली वाघ, बिबट्यांची २६ नखे; तस्करीप्रकरणी तिघांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : वाघ आणि बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा सीबीआयने पदार्फाश केला असून या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. तिनही आरोपींवर वन्यजीव संरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिल्ली आणि राजस्थान येथून वाघ आणि बिबट्या यांच्या नखांची तस्करी होत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या अनुषंगाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दोन्ही ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत वाघांची सात नखे आणि बिबट्याची १९ नखे अधिकाऱ्यांना सापडली. ती जप्त करण्यात आली आहेत. या नखांची तस्करी करून लाखो रुपयांना विकण्याचा उद्योग ही टोळी करत होती. या प्रकरणी प्रींटर पटेल, परमजीत सिंग आणि अशोक पारेख यांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: cbi seized 26 claws of tiger and leopard three arrested in smuggling case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.