पैसेच पैसे! बेड, सुटकेसमध्ये नोटांचे बंडल; WAPCOS च्या माजी CMDकडे सापडलं 20 कोटींचं घबाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 10:28 AM2023-05-03T10:28:06+5:302023-05-03T10:35:00+5:30

राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवल्यानंतर दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

cbi seizes 20 crore rupees rajender kumar gupta wapcos water power consultancy former cmd delhi | पैसेच पैसे! बेड, सुटकेसमध्ये नोटांचे बंडल; WAPCOS च्या माजी CMDकडे सापडलं 20 कोटींचं घबाड

पैसेच पैसे! बेड, सुटकेसमध्ये नोटांचे बंडल; WAPCOS च्या माजी CMDकडे सापडलं 20 कोटींचं घबाड

googlenewsNext

सीबीआयने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल आणि उर्जा सल्लागार (WAPCOS) चे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता यांच्या घरावर छापे टाकून सीबीआयने तब्बल 20 कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवल्यानंतर दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले. याच दरम्यान, 20 कोटी रुपयांची रोख तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

फोटोमध्ये सुटकेस आणि बेडमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड सापडली. सीबीआयने पुढील तपास सुरू असून हा पैसा कुठून आला याची चौकशी सुरू आहे. हे सर्व समोर आल्यानंतरच संपूर्ण प्रकरण स्पष्ट होईल की एवढे पैसे आले कुठून? असं म्हटलं आहे. 

WAPCOS हा जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सरकारचा संपूर्ण मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. पूर्वी 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (WAPCOS water & power consultancy India) म्हणून ओळखला जात असे. सध्या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cbi seizes 20 crore rupees rajender kumar gupta wapcos water power consultancy former cmd delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.