दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपास करावा, सुशांतसिंहच्या मित्राची उच्च न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 06:15 AM2020-10-30T06:15:13+5:302020-10-30T07:20:57+5:30
दिशा(२८) हिचा मृत्यू ८ जून रोजी मालाड येथील राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर सहा दिवसांनी १४ जून रोजी ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मित्र आणि जिम पार्टनर सुनील शुक्ला याने सुशांतची माजी व्यवस्थापक दिशा सालीयन हिचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशा मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
दिशा(२८) हिचा मृत्यू ८ जून रोजी मालाड येथील राहत्या इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर सहा दिवसांनी १४ जून रोजी ३४ वर्षांच्या सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत, दिशाचा मृत्यू संशयास्पदरीत्या झाला. मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूचा तपास करताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष केले, असे शुक्ला याने याचिकेत म्हटले आहे.
मार्च ते एप्रिल २०२० दरम्यान दिशा, सुशांत एकमेकांच्या संपर्कात होते, याचे पुरावे याचिकाकर्त्याकडे (शुक्ला) आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करत आहे. तर दिशाच्या मृत्यूचा तपासही सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी शुक्ला यांनी केली आहे.