चिदंबरम यांच्या अटकेसाठी सीबीआयचं पथक गेलं, पण रिकाम्या हातीच परतलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:26 PM2019-08-20T19:26:50+5:302019-08-20T19:32:10+5:30
चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर आता कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर चिदंबरम यांच्या चेन्नई येथील घरी सीबीआयचे पथक आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. मात्र, चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग, भ्रष्ट्राचारप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरमयांचा अटकपूर्व जामीन फेटाळून दणका दिला आहे. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर तात्काळ चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती.
The team of Central Bureau of Investigation (CBI) officers has left from the residence of P Chiadambaram. https://t.co/SnKbDKhElP
— ANI (@ANI) August 20, 2019
पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका; अटकेची शक्यता