CCTV दुरूस्त करणाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये घेतला अॅक्सेस, रेकॉर्ड केले कपलचे खाजगी क्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 10:40 AM2021-06-26T10:40:54+5:302021-06-26T10:49:28+5:30
दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता.
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरूहून राशिद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोप आहे की, राशिदने दिल्लीमध्ये एका घरात सीसीटीव्ही ठीक करण्याच्या बहाण्याने त्याचा अॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर तो सीसीटीव्हीतून घरात असलेल्या पती-पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ तो त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करत होता. इतकंच नाही तर नंतर तो कपलला ब्लॅकमेल करत लाखो रूपयांची मागणी करत होता.
दिल्ली पोलिसांनुसार, साउथ दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने तक्रार केली होती की, काही महिन्यांआधी त्यांचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब झाला होता. अशात सीसीटीव्ही कॅमेरा ज्या कंपनीने लावला होता त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार केल्यावर कंपनीने सीसीटीव्ही कॅमेरा ठीक करण्यासाठी एक टेक्नीशिअन पाठवला. (हे पण वाचा : बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...)
मात्र, या दरम्यान टेक्नीशिअनने कॅमेरा ठीक करत सीसीटीव्हीचा अॅक्सेस त्याच्या मोबाइलमध्ये घेतला आणि तेथून निघून गेला. काही महिन्यांनी दाम्पत्याच्या मोबाइलवर त्यांचेच प्रायव्हेट व्हिडीओ येऊ लागले आणि सोबतच धमकी देत म्हणाला की, ३ लाख रूपये द्या नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणार.
पोलिसांनी तपास करत राशिदला बंगळुरूहून अटक केली. राशिद मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. आधी राशिद दिल्लीमध्ये काम करत होता आणि त्यादरम्यानच त्याने हा प्रकार केला होता. लॉकडाऊननंतर तो नोकरी सोडून बंगळुरूला नोकरी करण्यासाठी गेला होता. (हे पण वाचा : गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड)
पीडित पती आणि पत्नी दोघेही नोकरी करतात. मुलगी घरात एकटी राहते आणि तिची काळजी घेण्यासाठी एक मेड ठेवलेली आहे. त्यामुळे घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. मात्र, आरोपी राशिदने सीसीटीव्हीसोबत छेडछाड करत त्याचा अॅक्सेस आपल्या मोबाइलमध्ये घेतला होता. त्यानंतर दाम्पत्याचे प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड करत होता.
सध्या पोलिसांनी आरोपीचा मोबाइल सीज करण्यात आला आहे. त्याच्या मोबाइलमध्ये पोलिसांना काही व्हिडीओ सापडले आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे आणि जाणून घेतलं जाणार आहे की, त्याने असा प्रकार आणखी कुठे कुठे केलाय. सोबतच कधीपासून हे करत आहे.