स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 07:55 PM2020-08-14T19:55:54+5:302020-08-14T20:05:58+5:30

महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, १४ पोलिसांना शौर्य पदक, तर उल्लेखनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत.

Center govt. announces police medals for Independence Day | स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर

Next
ठळक मुद्दे शौर्य पुरस्कारासाठी नाव जाहीर झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमध्ये ५५ जवान सीआरपीएफचे आहेत. एकूण देशातील पोलिसांच्या कामाचं कौतुक करताना पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत एकूण २१५ पोलिसांना शौर्य पोलीस पदकं देण्यात आली आहेत.

नवी दिल्ली - १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. पुरस्कार देण्यात आलेल्या एकूण ९२६ पोलिसांत महाराष्ट्रातील एकूण ५८ पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ५ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, १४ पोलिसांना शौर्य पदक, तर उल्लेखनीय सेवेसाठी एकूण ३९ जणांना पोलीस पदक देण्यात आली आहेत.

एकूण देशातील पोलिसांच्या कामाचं कौतुक करताना पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत एकूण २१५ पोलिसांना शौर्य पोलीस पदकं देण्यात आली आहेत. तर विशेष सेवेसाठी एकूण ८० राष्ट्रपती पोलीस पदकं आणि गुणवंत सेवेसाठी एकूण ६३१ पोलीस पदकं प्रदान करण्यात येणार आहे. देण्यात येणाऱ्या एकूण २१५ शौर्य पुरस्कारांपैकी १२३ पुरस्कार हे जम्मू आणि काश्मीरमध्ये पोलिसांच्या विशेष कामगिरीसाठी आणि २९ पुरस्कार हे नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईसाठी आहेत. तर ८ पुरस्कार हे ईशान्य भारतातील कामगिरीसाठी देण्यात आले आहेत.


शौर्य पुरस्कारासाठी नाव जाहीर झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमध्ये ५५ जवान सीआरपीएफचे आहेत. तर ८१ जवान हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे, २३ उत्तर प्रदेश पोलीस दलातील, आणि १४ पोलीस महाराष्ट्र पोलीस दलातील आहेत. तसेच १६ दिल्ली पोलीस दलातील आणि १२ झारखंड पोलीस दलातील आहेत. उर्वरित पोलीस हे राज्य, केंद्र शासित प्रदेश आणि आणि केंद्रीय पोलिसांच्या सशस्त्र दलांमधील आहेत.

 

 

 

 

सहायक फौजदार सुनील पाटील यांना पोलीस पदक

जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील सहाय्यक फौजदार सुनील शामकांत पाटील यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. चाळीसगाव येथील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सारंगधर रानमाळे यांनाही हे पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती व पोलीस पदक जाहीर करण्यात येते. आज स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सुनील पाटील व रानमाळे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सुनील पाटील हे उपनिरीक्षक पदाची ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. जळगाव जिल्ह्यातून फक्त या दोनच जणांना हे पदक जाहीर झाले आहे.

एएसआय संदीप शर्मा यांना पोलिस पदक 
उल्लेखनीय सेवेबद्दल शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मनोहरलाल शर्मा यांना मानाचे पोलीस पदक जाहीर झाले.


 सुरक्षा यंत्रणांमध्ये उल्लेखनीय सेवा  देणाऱ्या देशातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेगवेगळे मानाचे पदक जाहीर केले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही पदके जाहीर होतात. आज जाहीर झालेल्या यादीत नागपूर शहर पोलिस दलातील एक मात्र एएसआय संदीप शर्मा यांना हे पदक जाहीर झाले आहे. १९८२ मध्ये ते नागपुरात पोलिस शिपाई म्हणून रुजू झाले होते. सध्या ते गुन्हे शाखेत क्राईम डेटा संकलन आणि विश्लेषणाचे काम करतात. त्यांना २००६ मध्ये ऑल इंडिया पोलीस ड्युटी मिट मध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला होता. क्राइम ऑबझरवेशन मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. २०१२ मध्ये मानवाधिकार आयोग स्पर्धेत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. २०१८ मध्ये डीजी ईनसिग्निया मेडल मिळाले आहे. अत्यन्त सुस्वभावी आणि मितभाषी अशी ओळख असलेल्या शर्मा  यांना ३९ वर्षांच्या सेवा काळात २७० पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र मिळाले आहेत. आज त्यांना पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने,  उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी सुधीर नंदनवार, किशोर जाधव आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

 

Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु 

Web Title: Center govt. announces police medals for Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.