मध्यवर्ती पोलिसांची कारवाई, उल्हासनगरात हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:13 PM2022-01-29T21:13:14+5:302022-01-29T21:14:00+5:30
Crime News : उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुंडांवर ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड जिल्ह्यातील कर्जत-पनवेल तालुक्यांतून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिसांनी शुक्रवारी रात्री हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या ३ गुंडांना जेरबंद करून गुन्हा दाखल केला. हद्दपारची कारवाई झालेले बहुतांश गुंड उल्लंघन करून शहरात वावरत असल्याची चर्चा होत आहे. अशा गुंडावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ गुंडांवर ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड जिल्ह्यातील कर्जत-पनवेल तालुक्यांतून हद्दपारीची कारवाई करण्यात आली. मात्र हद्दपारीचे उल्लंघन करून गुंड शहरात राहत असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. मध्यवर्ती पोलिसांनी हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या कल्यानी भीमराव खांडेकर याला शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता कॅम्प नं-३ संजय गांधीनगर येथुन अटक करून गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत मध्यवर्ती पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता कॅम्प नं-३ येथील राधा स्वामी सत्संग येथून हद्दपारीच्या कारवाईचे उल्लंघन करणाऱ्या हरदीप उर्फ सनी अजयसिंग लबाना याला अटक करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर तिसऱ्या घटनेत कॅम्प नं-३ शांतीनगर मीनाताई ठाकरेनगर येथून शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या सतीश उर्फ झंप्या अशोक कामटे याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.
शहरातून हद्दपारीची कारवाई केलेले बहुतांश गुंड हद्दपारचे उल्लंघन करून शहरात बिनधास्त राहत असल्याची ओरड झाली होती. तर उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपार कारवाई झालेल्या गुंडांनी मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात राहणाऱ्या अश्या गुंडावर सक्त कारवाईची मागणी होत