खिशातून पैसे काढून धुम ठोकणाऱ्याला बेड्या; सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई
By आशीष गावंडे | Published: January 9, 2024 10:25 PM2024-01-09T22:25:56+5:302024-01-09T22:26:22+5:30
शिवणी येथील रफिकखान हुसेनखान हा २५ वर्षांचा तरुण सायंकाळ होताच घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना गाठत असे.
अकोला : रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत नागरिकांना रस्त्यात एकटे पाहून त्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या आरोपीला मंगळवारी रात्री सिव्हील लाइन पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
शिवणी येथील रफिकखान हुसेनखान हा २५ वर्षांचा तरुण सायंकाळ होताच घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना गाठत असे. बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्या खिशातून रोख लंपास करण्यात रफिकचा हातखंडा आहे. मागील अनेक दिवसांपासून हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. याप्रकरणी सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात कलम ३९२,५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने रफिकखान हुसेनखान यास एमआयडीसी परिसरातून अटक केली असता त्याने सिव्हील लाईन, रामदासपेठ परीसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कारवाई सुरेश लांडे, किशोर सोनोने, संजय अकोटकर, भूषण मोरे, गणेश निलखन यांनी केली.