कोकेन विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:22 PM2019-01-11T20:22:34+5:302019-01-11T20:26:41+5:30
यातील परदेशी नागरिक असलेल्या आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह अश्याच चार आणखी परदेशी नागरिकांना पोलिसांनी अवैध्यपणे भारतात राहण्याबाबत ताब्यात घेतले आहे.
Next
ठळक मुद्देनागरिकांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे.इनॉक मेरिट, जारचिंग ओकांटे डासील्वर आणि प्रवीण बाबाजी पोटे अशी या आरोपींची नावे आहेत.
मुंबई - नवघर पोलिसांनी कोकेन या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या दोन परदेशी नागरिकांसह एक भारतीया नागरिकाला रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. या नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल ४ लाख ३५ हजार रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. इनॉक मेरिट, जारचिंग ओकांटे डासील्वर आणि प्रवीण बाबाजी पोटे अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण एकूण २८ ग्रॅम कोकन पोलिसांनी हस्तगत केले आहे. यातील परदेशी नागरिक असलेल्या आरोपींकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह अश्याच चार आणखी परदेशी नागरिकांना पोलिसांनी अवैध्यपणे भारतात राहण्याबाबत ताब्यात घेतले आहे.