नामांकित एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाने शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी; मुंबईतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:43 AM2022-11-01T06:43:28+5:302022-11-01T06:51:06+5:30

३२ वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Chairman of reputed education trust demands physical comfort from teacher; Incident in Mumbai | नामांकित एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाने शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी; मुंबईतील प्रकार

नामांकित एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाने शिक्षिकेकडे केली शरीरसुखाची मागणी; मुंबईतील प्रकार

googlenewsNext

मुंबई : डोंगरीतील एका नामांकित एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षाने शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यातील आरोपी ट्रस्ट अध्यक्षाने ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या पीडितेला जातिवाचक शिवीगाळ करत शरीरसुखाची मागणी केली. तसेच, शिक्षिका ऐकत नसल्याने अध्यक्ष आपल्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपसुद्धा तिने या तक्रारीत केला आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Chairman of reputed education trust demands physical comfort from teacher; Incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.