चाकणला एटीएम सेंटर फोडले, जीपला बांधून मशिन उखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:25 AM2019-02-07T00:25:27+5:302019-02-07T00:25:47+5:30

शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डनसमोरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे संपूर्ण एटीएम मशिनच पळवून रोकड लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला

Chakan broke the ATM center | चाकणला एटीएम सेंटर फोडले, जीपला बांधून मशिन उखडले

चाकणला एटीएम सेंटर फोडले, जीपला बांधून मशिन उखडले

googlenewsNext

चाकण - येथील शिक्रापूर रस्त्यावरील विशाल गार्डनसमोरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये असलेले एचडीएफसी बँकेचे संपूर्ण एटीएम मशिनच पळवून रोकड लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, सायरन वाजल्याने चोरट्यांनी एटीएम मशिन सोडून पोबारा केला. याप्रकरणी चार अज्ञात चोरट्यांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसाच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. ५) पहाटे तीनच्या सुमारास माणिक चौकाजवळील शिक्रापूर रस्त्यावरील चंद्रश्री कॉम्प्लेक्समध्ये घडली. चोरट्यांनी एटीएम मशिन पिकअप जीपला दोरीने बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायरनचा मोठमोठ्याने आवाज सुरू झाल्याने चोरट्यांचा प्लॅन फसला. कॅमेऱ्यामध्ये आपण कैद होऊ नये, म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयावर काळ्या रंगाचे स्प्रे मारले होते.

घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले असता एका पिकअप जीपने चेहºयाला रुमाल बांधलेले चार जण एटीएम सेंटरसमोर आले. एटीएम सेंटरच्या सुरक्षेसाठी असलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयावर चोरट्यांनी काळ्या रंगाचा स्प्रे मारला. त्यानंतर एटीएम सेंटरच्या बाहेर उभ्या केलेल्या पिकअप जीपला दोरीच्या साह्याने एटीएम बांधले व एटीएम मशिन उखडण्याचा प्रयत्न केला. या वेळी एटीएम सेंटरमधील सायरनचा आवाज सुरू झाल्याने चारही चोरट्यांनी एटीएम मशिन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

एसजीएस कंपनीचे अधिकारी प्रकाश हिरामण पाटील (वय ३५, रा. वडगावशेरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याबाबत चाकण ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रकाश पाटील यांना मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास एसजीएस कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयातून फोन आला, की चाकण येथील एचडीएफसीच्या एटीएम सेंटरमध्ये काही संशयास्पद हालचाली सुरू आहेत. त्यानंतर पाटील यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Chakan broke the ATM center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.