बापरे! ५ कोटींच्या कारसाठी आकारला दंड, मालकाचे उत्तर ऐकून पोलीसही झाले अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:28 PM2022-02-10T20:28:17+5:302022-02-10T20:37:30+5:30

Traffic police put fine on 5 crore lamborghini car : कार एका व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. ही कार जयपूरचे व्यावसायिक आणि राष्ट्रीय नेमबाज विवान कपूर यांची आहे.

Challan cut for Rs 5 crore car, even the police were surprised to hear the owner's reply | बापरे! ५ कोटींच्या कारसाठी आकारला दंड, मालकाचे उत्तर ऐकून पोलीसही झाले अवाक्...

बापरे! ५ कोटींच्या कारसाठी आकारला दंड, मालकाचे उत्तर ऐकून पोलीसही झाले अवाक्...

googlenewsNext

जयपूरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी चलान कापण्यासाठी आलिशान कार थांबवली तेव्हा मोठी गर्दी झाली होती. खरंतर ही कार पहिल्यांदाच जयपूरच्या रस्त्यावर धावताना दिसली. नंबरशिवाय धावणाऱ्या लॅम्बोर्गिनी कारसाठी पाच हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असून त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे. कार एका व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. ही कार जयपूरचे व्यावसायिक आणि राष्ट्रीय नेमबाज विवान कपूर यांची आहे.

पिंक सिटीमध्ये मोठ्या चौकात नंबरप्लेट नसलेली ही आलिशान कार भरधाव वेगात चालवली जात होती. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली. पोलीस हवालदाराने आलिशान कार चालवणाऱ्या तरुणाला गाडीच्या नंबर प्लेटबाबत विचारणा केली असता, तरुणांनी सांगितले की, परदेशी गाडीच्या समोर नंबर प्लेट दिसत नाही.

यादरम्यान घटनास्थळी तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल (फीड कॉन्स्टेबल) सुलतान सिंग यांनी वाहतूक निरीक्षक उत्तर नरेश कुमार मीना यांच्याशी बोलून संपूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर माहिती विचारली. यावर वाहतूक निरीक्षक उत्तर नरेश कुमार मीना यांनी नंबर प्लेट नसल्यास भारतीय मोटार वाहन कायद्यांतर्गत चलान तयार करण्यास सांगितले. यानंतर हेड कॉन्स्टेबलने ५ हजार रुपयांचे चलान कापले. तरुणाने जागेवरच डिजिटल पेमेंटद्वारे पैसे भरले. पोलिसांनी तरुणास नंबर प्लेट लावण्याची सूचना दिली.

लोक रस्त्यावर उभे राहून लॅम्बोर्गिनीसोबत सेल्फी घेऊ लागले

ही कारवाई सुरू असतानाच ५ कोटींच्या आलिशान कारसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. चलान तयार करताना कार १५ मिनिटे रस्त्यावर उभी होती. दरम्यान, गाडीचे फोटो काढणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर चक्का जाम झाला होता. कसेबसे वाहतूक पोलिसांनी लोकांना तेथून हुसकावून लावले आणि गर्दी पांगवली.

जयपूरचा उद्योगपती आणि राष्ट्रीय नेमबाज विवान कपूरची कार

ही कार राष्ट्रीय नेमबाज आणि जयपूरचे व्यावसायिक विवान कपूर यांची आहे. वाहतूक पोलीस सुलतान सिंग यांनी सांगितले की, गाडी चालवणारा तरुण मला लग्नाला जायला उशीर होत आहे, तुला पाहिजे तेवढा दंड घे आणि लवकर निघून जा, असे सांगत होता. त्याला कडक सूचना देऊन सोडण्यात आले.

Web Title: Challan cut for Rs 5 crore car, even the police were surprised to hear the owner's reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.