चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 03:23 PM2022-05-06T15:23:09+5:302022-05-06T15:25:56+5:30

Girl's High voltage drama in Chandigarh: पोलिसांना सूचना मिळाली की एक तरूणी अल्टो कारवर चढून गोंधळ घालत आहे. त्यानंतर महिला पोलीस आणि काही अधिकारी तिथे पोहोचले.

Chandigarh : Lady high voltage drama rash driving viral video | चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ

चंडीगढमध्ये तरूणीचा हायव्होल्टेज ड्रामा, कारच्या छतावर चढून घातला गोंधळ

googlenewsNext

Girl's High voltage drama in Chandigarh: चंडीगढच्या सेक्टर ११/१२ च्या डिवायडिंग रोडवर बुधवारी रात्री एका तरूणीने कारवर चढून धिंगाणा घातला. पोलिसांनी मोठ्या मुश्कीलीने तरूणीला खाली उतरवलं आणि तिला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत की, तरूणीने नशा केला होता की नाही.

पोलिसांना सूचना मिळाली की एक तरूणी अल्टो कारवर चढून गोंधळ घालत आहे. त्यानंतर महिला पोलीस आणि काही अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी तरूणीला समजावून खाली उतरण्यास सांगितलं. पण तिने काही ऐकलं नाही. ती गाडीच्या छतावरच बसून होती. कधी उभी उभी राहत होती तर कधी झोपत होती. यादरम्यान लोकांची मोठी गर्दी जमली होती.
आरोप आहे की, तरूणी लोकांना काही आक्षेपार्ह इशारेही करत होती. महिला पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर तिला खाली उतरवलं. पोलिसांनी अल्टो कारच्या मालकाच्या जबाबावरून तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

पोलिसांनुसार ही तरूणी मंगळवारी पीजीआय चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेली होती. ती उत्तराखंडची राहणारी आहे. तिने फार्मसीचा कोर्सहीकेला आहे. गोंधळ घालणारी तरूणी काही दिवसांपूर्वी पीजीआयच्या आतील मेडिकल स्टोरमध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती. नोकरी देण्याआधी तिला ट्रायलवर ठेवण्यात आलं. पहिल्या दिवशी ती कामावर गेली. पण दुसऱ्या दिवशी गेली नाही. नंतर तिने तिथे काम करण्यास नकार दिला. यानंतर तिने १०० नंबरवर कॉल केला तर पोलीस तिला चौकीत घेऊन गेले. तिथे तिने तक्रार दाखल केली की स्टोरमध्ये काम करणारा एक कर्मचारी तिच्यासोबत रेप करण्याचा प्रयत्न करत होता. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.

अनेक लोकांनी सांगितलं की, या तरूणीने याआधीही एका ठिकाणी गोंधळ घातला होता. आता ती सेक्टर ११ मध्ये येऊन गोंधळ घालत आहे. तिथे उपस्थित लोकांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 

Web Title: Chandigarh : Lady high voltage drama rash driving viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.