धक्कादायक! ६० विद्यार्थीनींचा MMS व्हायरल, आंघोळ करताना रेकॉर्ड केला व्हिडिओ; ८ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:31 AM2022-09-18T08:31:34+5:302022-09-18T08:32:19+5:30

महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले.

chandigarh university mms viral of 60 students 8 attempted suicide | धक्कादायक! ६० विद्यार्थीनींचा MMS व्हायरल, आंघोळ करताना रेकॉर्ड केला व्हिडिओ; ८ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! ६० विद्यार्थीनींचा MMS व्हायरल, आंघोळ करताना रेकॉर्ड केला व्हिडिओ; ८ मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

चंडीगड-

पंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. हे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर हॉस्टेलच्या ८ विद्यार्थीनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शनं केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. 

चंडीगड युनिव्हर्सिटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मध्यरात्री जवळपास अडीच वाजता काही विद्यार्थीनी युनिव्हर्सिटीच्या गेटजवळ पोहोचल्या आणि जोरजोरदात घोषणाबाजी करू लागल्या. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे. संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत. 

पीडित विद्यार्थीनींची जोरदार घोषणाबाजी
युनिव्हर्सिटीच्या गेटवर जाऊन रात्री उशीरा विद्यार्थीनींनी जोरदार हंगामा केला आणि निदर्शनं केली. आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली आहे. तसंच हॉस्टेलमध्ये युनिव्हर्सिटी प्रशासनानं इतर विद्यार्थींसमोर याप्रकरणाबाबत तिला जाबही विचारला आहे. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असल्याचं तिनं सांगितलं आहे. अद्याप पोलिसांकडून याप्रकरणी कोणत्याही गुन्ह्याची नोंद किंवा अटकेच्या कारवाईबाबत माहिती समोर आलेली नाही. 

८ विद्यार्थीनींनी केला आत्महत्येचा प्रयत्न
विद्यापीठातील ६० विद्यार्थीनींचा एमएमएस बनवून इंटरनेटवर अपलोड करण्यात आला होता. जेव्हा विद्यार्थींनीपर्यंत त्यांचे व्हिडिओ पोहोचले तेव्हा त्यांना हे असं कसं घडलं याबाबत काहीच कळेना. या घटनेमुळे वसतीगृहातील ८ विद्यार्थींनीनी आपलं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. यातील एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर सात विद्यार्थीनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: chandigarh university mms viral of 60 students 8 attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.