बृजभूषणविरोधात चार्जशिट! गुन्हे सिद्ध झाले तर किती वर्षांची शिक्षा, पुढचे आयुष्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 08:44 AM2023-06-16T08:44:12+5:302023-06-16T08:45:01+5:30
बृजभूषण यांच्याविरोधात छेड़छाड, लैंगिक शोषण आणि पाठलाग करण्यासारख्या कलमांनुसार खटला तयार करण्यात आला आहे.
महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरून अडचणीत आलेले भाजपा खासदार आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहांना मोठा दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने आरोप मागे घेतल्याने ते वाचले आहेत. परंतू, अन्य कुस्तीपटुंनी केलेल्या आरोप, दिलेल्या पुराव्यांवरून दिल्ली पोलिसांनी १००० पानांची चार्जशीट दाखल केली आहे.
बृजभूषण यांच्याविरोधात छेड़छाड, लैंगिक शोषण आणि पाठलाग करण्यासारख्या कलमांनुसार खटला तयार करण्यात आला आहे. यामध्ये कुस्ती संघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर देखील आरोपी आहेत. यातील पॉक्सोची केसच पांगळी झाल्याने बृजभूषण बचावले आहेत.
या खटल्याची पुढील सुनावणी ४ जुलैला ठेवण्यात आली आहे. यात बजरंग पुनिया सारख्या साक्षीदारांचीनी नावे आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर बृजभूषण यांना एक ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकणार आहे.
- विनयभंग (IPC 354) : एक वर्षाचा कारावास जो पाच वर्षांपर्यंत वाढू शकतो.
- पाठलाग (IPC 354 D) : पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षा. दुसऱ्यांदा केल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा.
- लैंगिक अत्याचार (IPC 354A) : तीन वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही.
- गुन्ह्याला प्रवृत्त करणे (IPC 10 : प्रवृत्त करण्याच्या गुन्हासाठी निश्चित केलेली शिक्षा
- धमकावणे (IPC 506) : किरकोळ धमकीसाठी दोन वर्षे कारावास, गंभीर धमकीसाठी सात वर्षांचा कारावास.