हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग प्रकरणी दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

By पूनम अपराज | Published: October 20, 2020 02:58 PM2020-10-20T14:58:50+5:302020-10-20T14:59:38+5:30

Terror Funding Case : दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित कमांडरांकडून भारताकडून बंदी घातलेल्या संघटनेकडून पैसे उभे करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Chargesheet filed against ten accused in Hizbul Mujahideen narco funding case | हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग प्रकरणी दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग प्रकरणी दहा आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

Next
ठळक मुद्दे “आज मोहाली येथील एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को दहशतवाद प्रकरणातील १० आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करीत आहे,” अशी माहिती एनआयएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्यासाठी विनंती केली.

मोहालीच्या एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को-दहशतवाद प्रकरणातील दहा आरोपींविरूद्ध आज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए)ने  आरोपपत्र दाखल केले आहे.  दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित कमांडरांकडून भारताकडून बंदी घातलेल्या संघटनेकडून पैसे उभे करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

“आज मोहाली येथील एनआयए विशेष न्यायालयात हिजबुल मुजाहिद्दीन नार्को दहशतवाद प्रकरणातील १० आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करीत आहे,” अशी माहिती एनआयएच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्यासाठी विनंती केली. या अधिकाऱ्याने सांगितले की, 25 एप्रिल 2020 रोजी 29 लाख रुपयांसह हिलाल अहमद वाघाय याच्या अटकेमुळे हिजबुल मुजाहिद्दीन नार्को फंडिंग मॉड्यूलचा भांडाफोड होऊन त्याबाबत माहिती मिळाली. “या प्रकरणात दहशतवादी टोळी पाकिस्तानला तस्करी, विक्री व त्याचे चॅनेलिंग प्रक्रियेतून हवालाद्वारे आणि काश्मीरमधील हिजाबुल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांना त्यांच्या स्लीपर सेल व इतर साथीदारांमार्फत पैसे मिळण्यासाठी स्थापित केले गेले आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.


या अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानस्थित हिजाबुल कमांडर आणि भारतातील दहशतवादी टोळी यांच्यात बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेसाठी “पैसे उभाराण्याचा” कट रचला होता. मंगळवारी आरोप लावण्यात आलेल्या 10 आरोपींपैकी सात आरोपींना अटक करण्यात आली असून दोन फरार आहेत. यावर्षी 6 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिजाबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाझ नाईकू याचा मृत्यू झाला होता.

एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 30 जुलै रोजी दहशतवादविरोधी चौकशी एजन्सीच्या पथकाने वाघा या ट्रक चालकाच्या घरी छापा टाकला होता. त्याला पंजाब पोलिसांनी 25 एप्रिल रोजी 29 लाख रुपयांहून अधिक रोख रक्कमसह अटक केली होती. हा पैसा काश्मीर खोऱ्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य ऑपरेशनल कमांडर नायकू यांच्याकडे सोपविण्यासाठी नेला जात होता. 8 मे रोजी पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ”एनआयएने म्हटले होते.


सीमाशुल्क विभागाने जूनमध्ये अटारी सीमेवर ५३२ किलोग्राम हेरोइन जप्त केल्याप्रकरणी दाखल केलेल्या एका प्रकरणात रणजित सिंह आणि त्याचा साथीदार इक्बालसिंग उर्फ शेरा हे मुख्य आरोपी आहेत. हे अमली पदार्थ पाकिस्तानमधून आयात केलेल्या मीठा कन्साईनमेन्ट लपवून आणल्याचे आढळून आले. या प्रकरणातील रणजित हा मुख्य आरोपी आहे, ज्यामुळे मारला गेलेल्या अतिरेकी नाईकूचा जवळचा सहकारी हलील अहमद वागाय याला अटक करण्यात आली. त्यात रणजित आणि त्याचे पाच भाऊ अनेक वर्षांपासून ड्रग्सची तस्करी आणि पेडलिंगमध्ये गुंतले होते.

Web Title: Chargesheet filed against ten accused in Hizbul Mujahideen narco funding case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.