Home Theatre Blast: 'होम थिएटर ब्लास्ट' प्रकरणात मोठा खुलासा; वधुच्या प्रियकरानेच त्यात ठेवला होता बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:03 PM2023-04-05T22:03:00+5:302023-04-05T22:07:09+5:30

Chattisgarh Home Theatre Blast: लग्नात गिफ्ट मिळालेल्या होम थिएटरचा भीषण स्फोट होऊन नवऱ्या मुलासह मोठ्या भावाचा मृत्यू झाला.

Chattisgarh Home Theater Blast: Big reveal in Home Theater Blast case; An explosion caused by a lover | Home Theatre Blast: 'होम थिएटर ब्लास्ट' प्रकरणात मोठा खुलासा; वधुच्या प्रियकरानेच त्यात ठेवला होता बॉम्ब

Home Theatre Blast: 'होम थिएटर ब्लास्ट' प्रकरणात मोठा खुलासा; वधुच्या प्रियकरानेच त्यात ठेवला होता बॉम्ब

googlenewsNext


Chattisgarh Home Theatre Blast:छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील रेंगाखार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी झालेल्या होम थिएटर बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. होम थिएटर नैसर्गिकरित्या फुटले नसून, वधूच्या प्रियकराने त्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांसमोर सरजू मरकम (33) याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील छपला गावचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले.

एसपी लाल उमेंद सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, 30 मार्चला लग्नाच्या रात्री सरजू मरकाम याचा प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याशी फोनवरुन वाद झाला. बदला घेण्यासाठी आरोपीने होम थिएटरमध्ये अमोनियम नायट्रेट आणि सुतळी बॉम्बपासून बनवलेले दिड किलो स्फोटकं फिट केली. हे होम थिएटर त्याने प्रेयसीला लग्नात गिफ्ट केले. 

दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते
नवविवाहित महिला आणि सरजू मरकम यांच्यात जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मुलीचे लग्न ठरल्याने तो नाराज होता. मोबाईलवरुन नवऱ्या मुलाशी वाद झाल्यानंतर त्याने बदला घेण्यासाठीच हे कृत्य केले. आरोपीने ही स्फोटके कुठून आणली याचा तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान आरोपी सरजू मरकमने सांगितले की, तो यापूर्वी इंदूरच्या क्रशर प्लांटच्या (स्टोन क्रशर) ब्लास्टिंग विभागात काम करत होता. त्यामुळे त्याला आधीच स्फोटके आणि ब्लास्टिंगची माहिती होती.

प्रकरण काय?
सोमवारी(3 एप्रिल) रेंगाखार पोलीस स्टेशन हद्दीतील चामारी गावातील घरात होम थिएटरचा स्फोट झाला. या स्फोटात एक नवविवाहित तरुण आणि त्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला. हा स्फोट इतका जोरदार होता की, ज्या खोलीत हे होम थिएटर ठेवण्यात आले होते त्या खोलीच्या भिंती कोसळल्या. हेमेंद्र मेरावी(22) आणि राजकुमार (30) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत, तर घरातील इतर चार जणही जखमी झाले आहेत. 
 

Web Title: Chattisgarh Home Theater Blast: Big reveal in Home Theater Blast case; An explosion caused by a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.