परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, ९ जणांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:07 PM2024-09-07T13:07:01+5:302024-09-07T13:07:26+5:30
या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून बनावट कॉल सेंटर चालवून परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. याशिवाय, ही टोळी लोकांना बनावट वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. या टोळीकडून लोकांची फसवणूक करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हे प्रकरण नोएडाच्या सेक्टर ६३ मधील आहे. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत बनावट कॉल सेंटर टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी बनावट कॉल सेंटरशी संबंधित नऊ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर अनेक दिवसांपासून सुरू होते.
पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. ही टोळी बनावट वर्क व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी दुबई, सर्बिया आणि कॅनडामध्ये लोकांना नोकरी देण्याचे सांगून नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत होती. सहा महिलांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीतील लोकांची चौकशी करताना पोलिसांनी या टोळीच्या मुख्य सूत्रधारालाही अटक केली आहे.
लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट कागदपत्रे जप्त
नोएडाच्या सेक्टर ६३ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे कॉल सेंटर बऱ्याच दिवसांपासून चालवले जात होते. लोकांची फसवणूक करण्यात येत होती. याबाबतची माहिती आम्हाला मिळाली. यानंतर आम्ही या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कॉल सेंटरच्या मुख्य सुत्रधारालाहीही अटक करण्यात आली आहे. हे कॉल सेंटर एक महिला चालवत होती. तसेच, आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.