शेतकऱ्यांची फसवणूक; पैसे न देता लाखो रुपयांचे बटाटे घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 09:06 PM2019-10-09T21:06:15+5:302019-10-09T21:08:43+5:30

तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Cheated with Three farmers of Uttar Pradesh | शेतकऱ्यांची फसवणूक; पैसे न देता लाखो रुपयांचे बटाटे घेतले

शेतकऱ्यांची फसवणूक; पैसे न देता लाखो रुपयांचे बटाटे घेतले

Next
ठळक मुद्दे 3 शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बटाटे नालासोपाऱ्यात ट्रेडिंग कंपनीला विकले.शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनी सोमवारी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा - उत्तरप्रदेशमधील 3 शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे बटाटे नालासोपाऱ्यात ट्रेडिंग कंपनीला विकले. पण त्याबदल्यात लाखो रुपये मोबदला न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उत्तरप्रदेश जिल्ह्यातील फिरोजाबाद येथील शिखवहाबाद गावातील 33 वर्षीय बृजमोहन राजनरेश यादव या शेतकऱ्याने 2016 साली नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवर राधे ट्रेडिंग कंपनीचे मालक अनुप भाई आणि त्यांची पत्नी नीरज यांनी विश्वासघात करून 3 लाख 87 हजार 245 रुपये किंमतीचे 25 हजार 655 किलो बटाटे खरेदी करून त्याचे फक्त 15 हजार रुपये रोख देत उर्वरित रक्कम 3 लाख 72 हजार 245 रुपये देतो असे सांगून अद्याप पर्यंत परत केलेली नाही. तसेच साक्षीदार सरविंद खजान सिंह याच्याकडून 6 लाख 75 हजार रुपये किंमतीचे व योगेंद्र महेशचंद्र सिंह याच्याकडून 2 लाख 1 हजार 428 रुपये किंमतीचे हजारो किलो बटाटे विकत घेऊन पैसे दिलेले नाही. राधे ट्रेडिंग कंपनीच्या मालकाकडून शेतकऱ्यांचे 12 लाख 48 हजार 673 रुपये आजपर्यंत दिलेले नाही. शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनी सोमवारी तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheated with Three farmers of Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.