Cheating Case: हजारो लोकांना लुबाडलं; 100 कोटींच्या फसवणूक प्रकरणात BSFचा माजी स्वयंपाकी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:33 PM2022-07-29T13:33:30+5:302022-07-29T13:34:17+5:30

Crime News: या सराईत गुन्हेगारावर 59 गुन्ह्यांची नोंद असून, 46 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता.

Cheating Case: Thousands of people were cheated; Former BSF cook arrested in 100 crore fraud case | Cheating Case: हजारो लोकांना लुबाडलं; 100 कोटींच्या फसवणूक प्रकरणात BSFचा माजी स्वयंपाकी अटक

Cheating Case: हजारो लोकांना लुबाडलं; 100 कोटींच्या फसवणूक प्रकरणात BSFचा माजी स्वयंपाकी अटक

Next

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमध्ये 100 कोटींहून अधिकच्या फसवणुकीत सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, या सराईत गुन्हेगारावर 59 गुन्ह्यांची नोंद असून, 46 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता. ओमराम उर्फ ​​राम मारवाडी असे पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीचे नाव असून तो जोधपूरचा रहिवासी आहे. रोहिणी परिसरात आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

पैसे कमवण्यासाठी नोकरी सोडली
आरोपीचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2004 ते 2006 दरम्यान त्याने बीएसएफमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले होते. पण लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्याने बीएसएफची नोकरी सोडली. यानंतर आरोपीने राजस्थानमधील जयपूरमध्ये सुरक्षा एजन्सी उघडली. जवळपास 60 जणांना नोकऱ्या मिळवून दिल्यानंतर त्याने एजन्सी दुसऱ्याला विकून स्वत:ची मार्केटिंग कन्सल्टन्सी कंपनी केली.

अशी केली 100 कोटींची फसवूक
त्याने सतत फसवणूक करत एकामागून एक कंपन्या सुरू करुन, नंतर बंद केल्या. आरोपीने एमआयएम नावाने मार्केटिंग फर्म सुरू केली होती, ज्यामध्ये 4000 रुपये दिल्यावर 500चा सफारी सूट आणि नंतर जास्त कमिशन देण्याचा दावा केला जायचा. फसवणुकीच्या या धंद्यात सामील झालेल्या सदस्यांना 10 नवीन सदस्य करावे लागायचे. अशाप्रकारे 12 महिने हजारो सभासद बनवून सुमारे 100 कोटींची फसवणूक करून तो फरार झाला.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केले
आरोपीने 2021 मध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे नवीन काम सुरू केले. या प्लॅटफॉर्मवरही त्याने लोकांची फसवणूक करून लवकर अधिक पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत पोलिसांना 59 प्रकरणे निदर्शनास आली आहेत. तर, 46 प्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

Web Title: Cheating Case: Thousands of people were cheated; Former BSF cook arrested in 100 crore fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.