कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 02:05 PM2019-03-15T14:05:09+5:302019-03-15T14:09:31+5:30

पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Cheating with Coast Guard officer's wife | कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारदारानी त्याच्या परिचित असलेल्या व्यक्तीला गाडीची चावी दिली. सहा दिवसांनंतर गाडी मिझोरामला पोहचेल अशा त्या दोघांनी भूलथापा मारल्या.याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई - सायबर ठकाने मिझोरामला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकाऱ्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पवई येथे राहणाऱ्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोराम येथे राहतो. त्यांना एक सेकंड हँड स्कॉर्पिओ गाडी हवी होती. फेब्रुवारीमध्ये त्यांनी कल्याण येथील एका डीलरकडून सव्वा तीन लाख रुपयांना स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली. खरेदीनंतर कागदपत्रांची पूर्तता करून स्कॉर्पिओ मिझोरमला पाठविली जाणार होती. मुंबईमधून गाडी मिझोरमला पाठवण्याकरिता मूव्हर्स आणि पॅकरची ऑनलाइन माहिती काढली. त्यांनी एका प्रसिद्ध मूव्हर्स आणि पॅकरचा ऑनलाइन क्रमांक मिळविला. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला.या घटनेनंतर सायबर भामट्याचा त्यांना फोन आला. गाडी पाठवण्याकरिता प्रकिया करायची असून दोन माणसे पाठवली आहेत असे तक्रारदारांना सांगण्यात आले.  त्यावर तक्रारदारांनी विश्वास ठेवला. तक्रारदारानी त्याच्या परिचित असलेल्या व्यक्तीला गाडीची चावी दिली. चावी दिल्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांना भामट्यांनी एक इन्व्हॉईस दिले. सहा दिवसांनंतर गाडी मिझोरामला पोहचेल अशा त्या दोघांनी भूलथापा मारल्या. गाडी पाठवण्याकरिता ऑनलाइन फी म्हणून ३३ हजार ८०६ रुपये ऑनलाइन बँक खात्यात जमा केले. मार्च महिना उजाडला तरी गाडी न मिळाल्यामुळे मिझोरममधील व्यक्तीने तक्रारदारांना संपर्क साधला. त्या इन्व्हॉईसवरून तक्रारदारांनी एका प्रसिद्ध मूव्हर्सशी संपर्क साधला तेव्हा परळ किंवा कळंबोली येथे मूव्हर्सचे कार्यालय नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तात्काळ पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Cheating with Coast Guard officer's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.