विवाहितेची फसवणूक, आठ जणांविरोधात गुन्हा, विवाहानंतर छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2023 08:15 PM2023-11-08T20:15:56+5:302023-11-08T20:16:55+5:30
संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी घेतले पाच लाख
खामगाव : एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून पाच लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. कौटुंबिक छळासोबतच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शाहीन परवानगी ज. ईलीयास अहमद रा. मिल्लत कॉलनी खामगाव या विवाहितेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार की, तिचे लग्न मिल्लत कॉलनीतील इलियास अहमद रियाज मोहंमद याच्यासोबत ६ सप्टेंबर २०२१ रोजी खामगाव येथे झाले. मात्र, त्यांनी सुरुवातीला लग्नास नकार दिल्याने पतीविरोधात यापूर्वी २४ ऑगस्ट २०२१ रोजी शहर पोलिसांत तक्रार देण्यास गेली असता, त्यावेळी माझी समजूत घालण्यात आली.
मला पोलिस स्टेशनमधून परत नेण्यात आले. रोख दोन लाख रुपये हुंडा आणि एक लाखाचे दागिने तसेच गृहपयोगी साहित्य खरेदी केल्यानंतर लग्न झाले. लग्नानंतर आरोपीने दोन लाख रुपयांची मागणी केली. गैर अर्जदारांच्या समक्ष ही मागणी पूर्ण केल्यानंतरही पतीचा छळ कमी झाला नसल्याचा आरोप तक्रारीत केला. याप्रकरणी पती इलियास अहमद रियाज अहमद, सासरा रियाज अहमद, मेहुणा ऐजाज अहमद रियाज अहमद दोघेही रा. बोरीपुरा, डोबारी वेस, खामगाव, मो. इब्राहिम मेंबर रा. अहेबाब कॉलनी, राजू पटेल रा. बर्डे प्लॉट, रशीद खान रा. सजनपुरी, बबलू पठाण आणि नईम मेंबर रा. बर्डे प्लॉट, यांच्या विरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास खामगाव शहर पोलिस करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षकांचा ठोठावला दरवाजा
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच न्याय मिळविण्यासाठी पीडित विवाहितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांसह, अपर पोलिस अधीक्षकांचा दरवाजा ठोठावला. अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. आपबिती कथन केली. त्यानंतर शहर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून उपरोक्त गुन्हा दाखल केला. न्याय न मिळाल्यास पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आत्महत्या करण्याची परवानगीही मागितली होती.