मुंबईतील व्यापाऱ्याची फसवणूक, कर्नाटकातील व्यावसायिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 08:49 PM2018-10-04T20:49:52+5:302018-10-04T20:50:07+5:30

चाळके यांच्या कंपनीकडून देशातील रत्नागिरी, रायगड, गोवा, पोटबंदर, पालघर, वेरावळ, द्वारका, ओखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छींची निर्यात केली जाते

Cheating trader in Mumbai, a businessman in Karnataka arrested by the police | मुंबईतील व्यापाऱ्याची फसवणूक, कर्नाटकातील व्यावसायिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

मुंबईतील व्यापाऱ्याची फसवणूक, कर्नाटकातील व्यावसायिकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

Next

मुंबई - मच्छीमार्केटमध्ये माशांची खरेदी करून पैस देण्यास टाळाटाळ करत मुंबईच्या व्यापाऱ्याची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या कर्नाटकच्या एका बड्या व्यावसायिकाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. टम्टानापराम अब्दुल रहमान (वय ५२) असे या आरोपीचे नाव आहे.  

मुंबईच्या फोर्ट परिसरात अमीना मंजिल येथे सी फूडची निर्यात करणारे तक्रारदार रघुनाथ चाळके यांनी तक्रार दिल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. चाळके यांच्या कंपनीकडून देशातील रत्नागिरी, रायगड, गोवा, पोटबंदर, पालघर, वेरावळ, द्वारका, ओखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मच्छींची निर्यात केली जाते. चाळके यांनी मच्छी निर्यातीचे काम राहुल इंटरनॅशनल कंपनीला दिले आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात चाळके यांचे रत्नागिरीतील सप्लायर अल्लादीन सोलकर हे मुंबईला आले होते. त्याच्यासोबत आरोपी रहमान हा देखील होता. सोलकरने आरोपींची आणि चाळके यांच्याशी ओळख करून दिली. त्यानुसार रहमानने चाळके यांच्याकडून सप्टेंबर  ते आॅक्टोबर महिन्यात तब्बल ५५ लाख ९५ हजार ३१२ रुपयांची माशांची निर्यात केली. त्याचे २७ लाख रुपये रहमानने चाळके यांना दिले. मात्र, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. 

चाळके यांनी संपर्क केला असता. रहमानने त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत, जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार चाळके यांनी कुलाबा पोलीस तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलीस कारवाईसाठी कर्नाटकला गेल्या रहमान फरार व्हायचा. मागील अनेक वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, रहमान हा काॅर्फ्रड मार्केट येथे माशांची खरेदी करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Cheating trader in Mumbai, a businessman in Karnataka arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.