महिलेचे सर्व कपडे उतरवून शोरूममध्ये तपासणी; दुकानदाराला होता चोरीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 09:44 PM2021-12-23T21:44:41+5:302021-12-23T21:45:10+5:30

Crime News : कपडे तपासल्यानंतर महिलेला काउंटरवर बनवलेले बिल मिळाले तेव्हा दुकानदाराने सांगितले की, त्यात एक तुकडा कमी आहे. महिलेने सांगितले की, माझ्याकडे नाही आहे पण दुकानदाराने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.

Check all the woman's clothes in the showroom; The shopkeeper was suspected of theft | महिलेचे सर्व कपडे उतरवून शोरूममध्ये तपासणी; दुकानदाराला होता चोरीचा संशय

महिलेचे सर्व कपडे उतरवून शोरूममध्ये तपासणी; दुकानदाराला होता चोरीचा संशय

Next

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कपड्यांच्या शोरूममधून एका महिलेने 11 नग खरेदी केले होते आणि ते सर्व चेंजिंग रूममध्ये तपासले होते. ही घटना बुधवारी घडली.


काउंटरवर बिल केले तर एक तुकडा कमी आला
कपडे तपासल्यानंतर महिलेला काउंटरवर बनवलेले बिल मिळाले तेव्हा दुकानदाराने सांगितले की, त्यात एक तुकडा कमी आहे. महिलेने सांगितले की, माझ्याकडे नाही आहे पण दुकानदाराने महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही.

सर्व कपडे काढून तपासले
यानंतर दुकानदाराने गार्डला बोलावून महिलेला तपासण्यास सांगितले. गार्डने महिलेला चेंजिंग रूममध्ये नेले आणि तिचे सर्व कपडे काढून तपासले. यामुळे महिलेला लाज आणि अपमान वाटू लागला. इतके कपडे घेतल्यानंतर तिला चोरासारखी वागणूक मिळाल्यानंतर तिला जबर धक्काच बसला.

चेंजिंग रूममधील महिलेचे कपडे उतरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याने तिने जवाहर सर्कल पोलिस ठाणे गाठून चेंजिंग रुममध्ये महिलेला कपडे काढायला लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलेने कपड्याच्या शोरूमवर गुन्हा दाखल केला.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
पोलिसांनीही याबाबत गांभीर्य दाखवत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमागे दुकानदाराचा हेतू काय होता आणि ही घटना जाणूनबुजून करण्यात आली होती का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Check all the woman's clothes in the showroom; The shopkeeper was suspected of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.