मुंबईतील केमिस्टचा ‘तिहार’ वॉर्डनसोबत ड्रग्जचा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 07:15 AM2024-11-01T07:15:16+5:302024-11-01T07:15:34+5:30

ग्रेटर नोएडा येथे कारवाई, चाैघे अटकेत

Chemist's drug factory in Mumbai with 'Tihar' warden | मुंबईतील केमिस्टचा ‘तिहार’ वॉर्डनसोबत ड्रग्जचा कारखाना

मुंबईतील केमिस्टचा ‘तिहार’ वॉर्डनसोबत ड्रग्जचा कारखाना

मुंबई : ग्रेटर नोएडा येथे अमलीपदार्थांची निर्मिती करणारा एक कारखाना नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो आणि दिल्ली पोलिसांनी उद्धवस्त केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिहार जेलमध्ये वॉर्डन असलेल्या एका व्यक्तीने हा अवैध कारखाना सुरू केला होता. त्याला दिल्लीतील एक व्यावसायिक आणि मुंबईत औषधाचे दुकान चालवणारी व्यक्ती यांची साथ होती.

याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये किमतीचे ९५ किलो अमलीपदार्थ जप्त केले आहेत. या कारखान्यात प्रामुख्याने मेथामेफ्टाइन या अमलीपदार्थांची निर्मिती होत होती. या प्रकरणात मॅक्सिको देशाचे नागरिक सहभागी असल्याचाही संशय अधिकाऱ्यांना असून त्या दृष्टीने आता पुढील तपास होत आहे.

Web Title: Chemist's drug factory in Mumbai with 'Tihar' warden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.