धक्कादायक! उधारीच्या बदल्यात २ बहिणींनी दुकानदाराला करू दिला स्वत:च्याच मुलींवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:49 PM2021-08-31T15:49:35+5:302021-08-31T15:49:46+5:30

तंबाखूची विक्री करत असल्यानं पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून समोर आली धक्कादायक माहिती

in chennai two sisters let shopkeeper rape their minor daughters for payment of goods fifty obscene video found | धक्कादायक! उधारीच्या बदल्यात २ बहिणींनी दुकानदाराला करू दिला स्वत:च्याच मुलींवर बलात्कार

धक्कादायक! उधारीच्या बदल्यात २ बहिणींनी दुकानदाराला करू दिला स्वत:च्याच मुलींवर बलात्कार

Next

चेन्नई: आई आपल्या मुलांना जीवापाड जपते, त्यांची काळजी घेते, असं आपण अनेकदा ऐकतो. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. मात्र काहीवेळा काही महिला या सगळ्याला काळिमा फासतात. माय लेकराच्या नात्यालाच धक्का लावतात. चेन्नईत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दुकानातून सामान घेण्याच्या बदल्यात दोन बहिणींनी दुकानदाराला आपल्याच मुलींवर बलात्कार करण्याची आणि त्याचं व्हिडीओ चित्रीकरण करण्याची परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस तपासात दुकानदाराच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलींचे ५० अश्लिल व्हिडीओ सापडले.

२ महिलांनी करू दिला ५ मुलींवर बलात्कार
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी ४८ वर्षांच्या दुकानदाराला अटक केली आहे. त्याचं नाव पेरुमल आहे. घरात लागणाऱ्या सामानाच्या बदल्यात दोन बहिणींनी स्वत:च्यावर अल्पवयीनं मुलींवर बलात्कार करण्याची परवानगी पेरुमलला दिली होती. त्यांनी पेरुमलला चित्रीकरण करण्याची परवानगीदेखील दिली होती. दोन बहिणींनी स्वत:च्या मुलींसोबतच त्यांच्या तीन मैत्रिणींवरही बलात्कार घडवून आणला. 

जीन्सवर पिवळा पेंट लावून विमानतळावर उतरला; अधिकाऱ्यांना संशय आला अन् मग...

प्रकरणाला कशी फुटली वाचा?
दुकानदारानं बलात्काराचे व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केले. त्यातूनच ही घटना उघडकीस आली. बंदी घालण्यात आलेला तंबाखू त्याच्या दुकानात विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी तंबाखूसोबतच पेरुमलचा मोबाईल जप्त केला. मोबाईलच्या तपासणीत पोलिसांना अल्पवयीन मुलींसोबत करण्यात आलेल्या कृष्णकृत्यांचे व्हिडीओ सापडले.

मोबाईलमध्ये सापडले ५० व्हिडीओ
पेरुमलनं अश्लील व्हिडीओ इंटरनेटवरून डाऊनलोड केले असावेत, असं पोलिसांना वाटलं. मात्र त्यांनी व्हिडीओ नीट पाहताच पेरुमलचं भांडं फुटलं. अश्लील व्हिडीओंमध्ये पेरुमलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पेरुमलला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यानंतर पेरुमल पोपटासारखा बोलू लावला. गेल्या ६ महिन्यांत ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. यानंतर पेरुमलविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याशिवाय आरोपी बहिणींवरदेखील गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

Web Title: in chennai two sisters let shopkeeper rape their minor daughters for payment of goods fifty obscene video found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.