धक्कादायक! वडिलांच्या अश्लील चाळ्यांना कंटाळली मुलगी, आजीकडे मागितली मदत; ऑडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:32 PM2021-07-14T16:32:28+5:302021-07-14T16:34:27+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, वडील आपल्या मुलीवर फेब्रुवारी २०१९ पासून वाईट नजर ठेवतोय. त्यामुळे मुलगी आपल्याच घरात भीतीच्या वातावरणात जगत आहे.
बिहारच्या छपरामध्ये एका मुलीचा तिच्या आजीसोबतच बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल ऑडिओमध्ये मुलीने तिच्या वडिलांवर अश्लील चाळे करण्याची तक्रार आजीकडे करत आहे. वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्यावर डीएसपीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, पीडिता पोलीस स्टेशनला न पोहोचल्याने आणि लिखित तक्रार न दिल्याने अजून एफआयआर दाखल झालेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, वडील आपल्या मुलीवर फेब्रुवारी २०१९ पासून वाईट नजर ठेवतोय. त्यामुळे मुलगी आपल्याच घरात भीतीच्या वातावरणात जगत आहे. ती इतकी घाबरून जगतेय की, शेजारी राहणाऱ्या सख्ख्या मावशीलाही ती काही सांगू शकत नाहीये. ही मुलगी सध्या ११व्या वर्गात शिकत आहे आणि मुलगा आठव्या वर्गात शिकत आहे. (हे पण वाचा : नशामुक्ती केंद्रात केअरटेकरने दोन तरूणींना किस करण्यास रोखलं, दोघींनी महिलेचे पाडले दात)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईसोबत तिच्या वडिलांचा व्यवहार चांगला नव्हता. लग्नापासूनच वडील आईसोबत अमानवीय व्यवहार करत होते. आई इंटर पास होती. पतीच्या व्यवहारामुळे आईचे माहेरचे लोक तिचे आधार बनले आणि तिला हिंमत दिली. ज्यानंतर काही महिन्यांपूर्वीच महिलेचं बिहार पोलिसा निवड झाली. सध्या ती ट्रेनिंगवर आहे.
पीडितेच्या आईच्या जॉयनिंगच्या दहा दिवसांनंतर तिच्या वडिलांचं वागणं बदललं आणि आपल्या मुलीप्रति त्याचा दृष्टीकोन बदलला. तो आधी मुलीसोबत अश्लील बोलत होता, त्यानंतर अश्लील चाळे करू लागला होता. गेल्या महिन्यात तर त्याने सर्व सीमा पार केल्या. रात्री दहा वाजतापासून सकाळी चार वाजेपर्यंत आपल्या मुलीच्या रूममध्ये होता आणि आपल्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. (हे पण वाचा : पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं)
आपली आब्रू वाचवण्यासाठी मुलीने आपल्या आजीकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याचा ऑडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हायरल ऑडिओनुसार, मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण घरात तिच्यावर उपचार केले गेले. एसपी संतोष कुमार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ऑडिओची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीनंतर पुढील कारवाई होईल.