चोरीच्या तपासाला गेले अन् पाण्याच्या टाकीत मृतदेहाचे ६ तुकडे आढळले; पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 09:29 AM2023-03-06T09:29:16+5:302023-03-06T09:30:35+5:30
आरोपीने २ महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केली होती. या आरोपात आता पोलिसांनी पतीला अटक केली आहे
बिलासपूर - देशात श्रद्धा वालकर हत्याकांड चांगलेच गाजले. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून आरोपी आफताबनं ते वेगवेगळ्याठिकाणी पोहचले. या घटनेने सर्वांना हादरून टाकलं होते. असाच एका अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार छत्तीसगडच्या बिलासपूर इथं घडला आहे. याठिकाणी एका पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ६ तुकडे केले. इतकेच नाही तर आरोपीने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे टेप लावून पाण्याच्या टाकीत ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने २ महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीची हत्या केली होती. या आरोपात आता पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. घरात दुर्गंध पसरल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी घराची तपासणी केली तेव्हा पाण्याच्या टाकीत ६ तुकड्यात मृतदेह पाहताच पोलिसांना धक्काच बसला. या घटनेची चौकशी करत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. मृतदेहाचे तुकडे जमा करत पोलिसांनी ते पोस्टमोर्टमला पाठवले तर गुन्हेगाराची चौकशी सुरू आहे.
Chhattisgarh | A man, Pavan Thakur detained for allegedly killing his wife Sati Sahu, chopping her off into pieces & dumping them in a water tank in his house in Uslapur, Bilaspur on suspicions of infidelity. Body recovered, Police say it may have been dumped 1-2 months ago. pic.twitter.com/Phb7cERD8Z
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 6, 2023
नेमकं काय घडलं?
गुन्हे शाखेच्या सायबर युनिटला सूचना मिळाली होती की, तखतपूर येथील पवनसिंह ठाकूर उसलापूर इथं भाड्याने राहायचा. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. हा युवक तखतपूरमधील चोरीत सहभागी होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. त्यानंतर पोलिसांनी युवकाच्या घरची झडती घेतली. तेव्हा घरात दुर्गंध येत असल्याचं पोलिसांना जाणवलं. तेव्हा पोलिसांनी टेरेसवरील पाण्याची टाकी पाहिली तर त्यात प्लॅस्टिकच्या बॅगला टेप लावून काहीतरी सामान लपवल्याचं दिसलं.
पोलिसांनी ते सामान बाहेर काढले तेव्हा त्यात महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा २ महिन्यापूर्वी पत्नी सीता साहूची हत्या करून तिचा मृतदेह तुकडे करून पाण्याच्या टाकीत टाकल्याचं म्हटलं. आरोपी पतीने ही हत्या का केली? या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी पोलीस आरोपीची चौकशी करत असून अद्यापही पोलिसांच्या प्रश्नांना टोलवाटोलवी करण्याचं काम आरोपी करत आहे. सध्या या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.