आधी विवाहित प्रेयसीला पळवलं, मग मुलीला केलं किडनॅप; जाणून घ्या आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:12 PM2022-01-04T16:12:25+5:302022-01-04T16:12:54+5:30
Chhattisgarh Crime New : अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा पोलिसही हैराण झाले.
छत्तीसगढच्या (Chhattisgarh) कवर्धामध्ये पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्याच्या आरोपात एक तरूण आणि त्याच्या अल्पवयीन मित्राला अटक केली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश आहे, ज्यातील तिसरा आरोपी फरार आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी सूरज वर्माला रायपूरमधून अटक केली. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा पोलिसही हैराण झाले.
News18 च्या एका वृत्तानुसार, जीताटोला येथे राहणारी महिला तीन महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर सूरजसोबत पळून गेली होती. महिलेला एक चार वर्षांची मुलगी आहे. या मुलीला महिला पतीकडेच सोडून गेली होती. एक दिवस महिलेला अचानक आपल्या मुलीची आठवण आली. त्यानंतर तिने प्रियकराला तिला आणण्यास सांगितलं. मग तिला प्रियकर सूरज दोन मित्रांसोबत जीताटोला गावात आला. इथे त्यांनी रेकी केली. त्यानंतर मुलीला बाइकवरून सोबत घेऊन गेले.
मुलीच्या वडिलांनी आधी मुलीचा गावात शोध घेतला. पण तिचा पत्ता कुठेही लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांनी मुलीची आई आणि तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीला आईकडून परत आणलं. तेच प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.
पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. कवर्धा एसपी डॉ. लाल उमेद सिंह यांनी सांगितलं की, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहत. सध्या महिलेविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कुटुंबियांना मुलीची चिंता होती. ती सुखरूप घरी आल्याने त्यांची चिंता दूर झाली.