हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी छोटा राजन दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 03:30 PM2019-08-20T15:30:07+5:302019-08-20T15:32:13+5:30
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर ५ जणांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं आहे.
मुंबई - कुख्यात गुंड छोटा राजनसह सहा आरोपींना मुंबईतील सत्र न्यालयाच्या विशेष कोर्टाने दोषी ठरविलं आहे. ऑक्टोबर २०१२ साली अंधेरीत हॉटेल व्यावसायिक बी.आर.शेट्टी यांच्या गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर ५ जणांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलं आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मोक्का कोर्टाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाने छोटा राजनला आठ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
२०१२ साली बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या शूटआऊट प्रकरणात छोटा राजनला शस्त्रे कायदानुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणी १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रात छोटा राजनच्या सांगण्यानुसार शेट्टी यांच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या असं नमूद करण्यात आलं आहे. त्याआधी २०१८ साली ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी देखील छोटा राजनला दोषी ठरविण्यात आलं होतं.
हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई - बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी छोटा राजनला कोर्टाने ठरविले दोषी
— Lokmat (@MiLOKMAT) August 20, 2019
https://t.co/CbvSFUjpi9
A Special Court in Mumbai convicts Rajendra Nikhalje alias Chhota Rajan for attempt to murder of hotelier BR Shetty. Arguments on quantum of sentence to commence later today. (file pic) pic.twitter.com/vqyKgffGML
— ANI (@ANI) August 20, 2019