छोटा राजनला सत्र न्यायालयाने दिला दणका, अन्य तिघांसह ठोठावली २ वर्षांची शिक्षा
By पूनम अपराज | Published: January 4, 2021 02:31 PM2021-01-04T14:31:32+5:302021-01-04T14:32:07+5:30
Chhota Rajan : छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता.
मुंबई - खंडणी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन आणि अन्य तिघांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे छोटा राजनच्या शिक्षेत वाढ झाली आहे. छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता. असा दावा केला जात होता की, राजन यांनी वाजेकर यांच्याकडून २६ कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणातील माहितीनुसार, बिल्डरने २०१५ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात जमीन खरेदी केली होती. विक्रीच्या भाग म्हणून परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला २ कोटी रुपयांचे कमिशन देण्यात आले. ठक्कर यांनी मात्र कमिशन म्हणून अधिक पैशांची मागणी केल, जे वाजेकर यांनी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ठक्कर यांनी छोटा राजन याच्याकडे संपर्क साधला असा आरोप आहे. त्यानंतर छोटा राजनने आपल्या माणसांना वाजेकर यांच्या कार्यालयात पाठवून २६ कोटींची मागणी केली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सदस्यांनी बिल्डरला जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
खंडणी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात गँगस्टर छोटा राजन आणि अन्य तिघांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. pic.twitter.com/a2nQS1yxhG
— Lokmat (@MiLOKMAT) January 4, 2021