सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याप्रकरणी छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे यांना पोलिसांनी बोलावले चौकशीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 04:27 PM2021-10-02T16:27:17+5:302021-10-02T16:49:56+5:30
Suhas Kande Thread : या समन्सनुसार निकाळजे हे आता नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह हजर झाले आहे.
नाशिक : शिवसेनेचे नाशिकचेआमदार सुहास कांदे यांना मोबाइलवर धमकी मिळाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशानुसार आरपीआय(ए) गटाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. या समन्सनुसार निकाळजे हे आता नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह हजर झाले आहे.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना फोनवरून थेट छोटा राजन टोळीकडून धमकी मिळाल्याचा प्रकार कांदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आला. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले, कारण या तक्रार अर्जामागे भुजबळ यांच्यावरील आरोपांची पार्श्वभूमी असल्याने महाविकास आघाडीचे दोन्ही नेते आमने-सामने आले. धमकी प्रकरणाची पोलीस आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात आले.
शिवसेनेचे नाशिकचे आमदार सुहास कांदे यांना मोबाइलवर धमकी मिळाल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशानुसार आरपीआय(ए) गटाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. pic.twitter.com/5daUgBVmg3
— Lokmat (@MiLOKMAT) October 2, 2021