महापालिकेच्या नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले; काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:35 PM2021-05-24T20:35:26+5:302021-05-24T20:37:29+5:30

Mira Bhayander News : पोलिसांनी पडताळणी केली असता १६ ते १७ वयोगटातील ५ बालकामगार नालेसफाईचे काम करत असल्याचे आढळून आले.

Child labour for municipal sanitation; Filed a case at Kashimira police station | महापालिकेच्या नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले; काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

महापालिकेच्या नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले; काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात ठेकेदाराने अल्पवयीन मजुरांना जुंपल्याने काशीमीरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ बालमजुरांना सुधारगृहात पाठवले आहे. परंतु पोलिसांनी मूळ ठेकेदार मालक व पालिका अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. 

महापालिकेने नालेसफाईसाठी मे. एम. ई. प्रोजेक्ट ली. या कंपनीला नालेसफाई कामी यंत्र सामुग्री, वाहने व मजूर पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे. मीरारोडच्या विनय नगर परिसरातील गटार साफ करण्यासाठी बालमजुरांना जुंपण्यात आल्याबाबत निदर्शनास आल्याने परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक शाखेस पडताळणी करून कारवाईचे आदेश दिले. 

पोलिसांनी पडताळणी केली असता १६ ते १७ वयोगटातील ५ बालकामगार नालेसफाईचे काम करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना बालसुधारगृहात पाठवले आहे. पोलिसांनी मनोज मयेकर व त्यांचे सुपर वायझर रमेश साहेबराव काळे (३५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परंतु पोलिसांनी मे. एम. ई. प्रोजेक्ट ली. चे कंपनीच्या मूळ मालकाला व पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांना आरोपी बनविले नाही. 
 

Web Title: Child labour for municipal sanitation; Filed a case at Kashimira police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.