हत्या करून पित होता रक्त, 'रक्तपिपासु' किलरचा गावातील लोकांनीच खेळ केला खल्लास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:09 PM2021-10-18T19:09:38+5:302021-10-18T19:10:43+5:30
केनियातील अधिकाऱ्यांनी त्याला 'रक्तपिपासु' असं नाव दिलं होतं. कारण वंजाला काही मुलांची हत्या करून त्यांचं रक्त पित होता.
केनियातील एका सीरिअल किलरला गर्दीने मारहाण करत त्याचा जीव घेतला. २० वर्षीय सीरिअलवर १० लहान मुलांची हत्या केल्याचा आरोप होता. त्याने सर्वच हत्यांमध्ये आपला गुन्हा कबूल केला होता. काही दिवसांपूर्वी तो पोलीस कस्टडीमधून फरार झाला होता. ज्यानंतर समजलं की, त्याची हत्या केली गेली. चला जाणून घेऊ काय आहे हे प्रकरण...
'मिरर यूके'नुसार, ही घटना केनियातील नैरोबीतील आहे. इथे २० वर्षीय मास्टेन मिलिमो वंजाला याला हत्येच्या केसमध्ये अटक करण्यात आली होती. चौकशीतून समोर आलं होतं की, त्याने एक दोन नाही तर १० लहान मुलांची निर्दयीपणे हत्या केली होती.
केनियातील अधिकाऱ्यांनी त्याला 'रक्तपिपासु' असं नाव दिलं होतं. कारण वंजाला काही मुलांची हत्या करून त्यांचं रक्त पित होता. याबाबत स्वत: त्याने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केले. त्याने सांगितलं की, १५ वर्षांचा असताना त्याने पहिली हत्या केली होती. ५ वर्षात त्याने १० लहान मुलांची हत्या केली.
त्याला जुलैमध्ये दोन मुले बेपत्ता झाल्यावर अटक करण्यात आली होती. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्याने पाच वर्षात १० मुलांची हत्या केल्याचं कबूल केलं. मात्र, हत्येप्रकरणी कोर्टात सादर करण्याच्या काही तासांआधी तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता.
लोकांनीच घेतला जीव
तो एका गावात लपला होता. याची खबर गावातील लोकांना लागली. त्यांना वंजालाबाबत सगळं काही माहीत होतं. लोकांनी त्याला शोधून काढलं आणि मारहाण सुरू केली. गर्दीने त्याला इतकी मारहाण केली की, त्याचा तिथेच जीव गेला. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना वंजालाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला.
रक्त पित होता वंजाल
पोलिसांनी सांगितलं की, 'लहान मुलांना मारून तो कधी कधी त्यांचं रक्त पित होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वंजाला जास्तीत जास्त १२ ते १३ वयोगटातील मुलांनाच शिकार करत होता. तो त्यांना नशेचे पदार्थ देऊन बेशुद्ध करत होता आणि नंतर चाकून हत्या करत होता.