बॉयफ्रेंड झाला हैवान! गर्लफ्रेंडला कारमधून खाली ढकललं अन् चिरडलं; मुलीच्या मृत्यूने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 03:38 PM2023-02-25T15:38:26+5:302023-02-25T15:40:29+5:30

गर्लफ्रेंडवरील हल्ल्यानंतर तो रस्त्याच्या मधोमध तिला सोडून तेथून पळून गेला

china shocked after man allegedly drives over girlfriend repeatedly and kills | बॉयफ्रेंड झाला हैवान! गर्लफ्रेंडला कारमधून खाली ढकललं अन् चिरडलं; मुलीच्या मृत्यूने खळबळ

फोटो: Weibo/SCP

googlenewsNext

चीनच्या हेबेई प्रांतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तांगशान शहरात एका प्रियकराने प्रेयसीला कारमधून ढकलून दिले आणि नंतर तिला चिरडलं. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेचे अनेक फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी याच शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये चार महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली होती.

साउथ चायना पोस्टनुसार, झांग असं या आरोपीचं नाव आहे, ज्याने आपली गर्लफ्रेंड 'वांग' ला कारमधून खाली ढकललं आणि तीन वेळा चिरडलं. हे विदारक दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी झांगने दुपारच्या सुमारास एका सार्वजनिक इनडोअर स्विमिंग पूलसमोर कारने महिलेला चिरडलं. 

गर्लफ्रेंडवरील हल्ल्यानंतर तो रस्त्याच्या मधोमध तिला सोडून तेथून पळून गेला, पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अहवालानुसार, वांग हिला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले जेथे काही वेळाने तिला मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यामागील कारण दोघांमधील वाद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नेमका कशावरून वाद झाला याचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर चीनमधील लोकांनीही सरकारच्या धोरणांना शिव्या द्यायला सुरुवात केली. महिलांना सुरक्षेचे आश्वासन न देता येथील सरकार अधिक विवाह आणि जन्मदर वाढविण्याचा आग्रह धरत आहे, हे किती हास्यास्पद आहे, असे लोकांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: china shocked after man allegedly drives over girlfriend repeatedly and kills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.