China's Peng Shuai: चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; आरोपाच्या अर्ध्या तासात पोस्ट डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 12:46 PM2021-11-04T12:46:37+5:302021-11-04T12:46:56+5:30

China's Peng Shuai Rape allegation #MeToo: देशभरात खळबळ उडताच तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुआईने वर्ल्ड नंबर-1 टेनिस डबल्स प्लेयर जिंकले आहे.

Chinese tennis star Peng Shuai makes sexual assault claims on Ex premier  | China's Peng Shuai: चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; आरोपाच्या अर्ध्या तासात पोस्ट डिलीट

China's Peng Shuai: चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; आरोपाच्या अर्ध्या तासात पोस्ट डिलीट

Next

बिजिंग : चीनची सर्वात मोठ्या स्टार प्लेअरपैकी एक असलेली पेंग शुआई हिने मंगळवारी रात्री खळबळजनक आरोप केले आहेत. चीनमधील सोशल मीडिया विबोवर तिने आपली आपबीती मांडली होती. परंतू, देशभरात खळबळ उडताच तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुआईने वर्ल्ड नंबर-1 टेनिस डबल्स प्लेयर जिंकले आहे.

शुआई हिने एका माजी पंतप्रधानावर आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी ते सत्तेत असताना जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. देशात खळबळ उडाल्य़ावर यानंतर अर्ध्या तासात हे ट्विट डिलीट करण्यात आले. 
न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार पेंग शुआईने सांगितले ती झांग गाओली हे पोलिट ब्युरो स्थायी समितीचे पूर्व सदस्य होते. त्यांनी तेव्हा जबरदस्तीने सेक्स करण्यासाठी दबाव टाकला होता. नंतर आम्हा दोघांमध्ये परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवले, अशी पोस्ट तिने केली होती. या पोस्टचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. ही पोस्ट डिलीट झाली तरी पेंग शुआई बाबत मोठ्या प्रमाणावर चिनी लोक सर्चिंग करू लागले होते. 

चीनमध्ये आघाडीच्या नेत्यांविषयीचे खासगी आयुष्य एक संवेदनशील विषय आहे. पेंगने पुढे म्हटलेले की, या आरोपांचे समर्थन करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विषयावर बोलणे टाळले आहे. प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, हा आंतरराष्ट्रांशी संबंधी प्रश्न नाहीय. चीनमध्ये 2018 मध्ये मीटू आंदोलन सुरु झाले होते. पोलिट ब्युरो ही चीनची आघाडीचे निर्णय घेणारी संस्था आहे. 

Web Title: Chinese tennis star Peng Shuai makes sexual assault claims on Ex premier 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन