चॉकलेट, खोडरबरमधून लपवून सोन्याची तस्करी, दुबईहून आलेल्या प्रवाशाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:19 PM2020-10-30T16:19:19+5:302020-10-30T16:19:57+5:30
Gold Smuggling : दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे ७ लाख ८९ हजार रुपये किंमतीचे १५१.८२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
पुणे : पुणेविमानतळावर कस्टम अधिका-यांनी दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे ७ लाख ८९ हजार रुपये किंमतीचे १५१.८२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. सोन्याचे एक रबर एका खोडरबरमध्ये टाकून ते कॅमेऱ्याच्या ट्रॉलीखालच्या बाजूस लपवून ठेवण्यात आले होते. तर दुसरे सोन्याचे रबर हे चॉकलेट बारमध्ये गुंडाळण्यात आले होते आणि सोन्याचा मुलामा असलेला सिल्व्हर बँड बॅगमध्ये ठेवण्यात आला होता.
दुबईवरून गुरुवारी (२९ ऑक्टोबर) हे विमान पुणे विमानतळावर आल्यानंतर प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली . त्यामध्ये एका प्रवाशाकडून १५१.८२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सुरू असल्याचे पुणे विमानतळ उपायुक्त मोतीलाल शेटे यांनी कळविले आहे.
Maharashtra: Custom officials at Pune Airport seized 151.82 g of gold valued at Rs 7.89 lakhs from a passenger from Dubai on 29th Oct. The gold was concealed in rubber erasers & hidden under handle of a bag. Further investigation underway. pic.twitter.com/kRt436ps7t
— ANI (@ANI) October 30, 2020