...चक्क पोलीस चौकीत स्वीकारली 13 हजारांची लाच, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:54 PM2021-02-16T22:54:49+5:302021-02-16T22:55:44+5:30

सातपुर पोलीस ठाणे : तीघे लाचखोर पोलीस रंगेहात सापळ्यात

... Chukka accepted a bribe of Rs 13,000 at the police station | ...चक्क पोलीस चौकीत स्वीकारली 13 हजारांची लाच, तिघांना अटक

...चक्क पोलीस चौकीत स्वीकारली 13 हजारांची लाच, तिघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देसातपूर पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार संशयित तक्रारदाराला त्यांची अटक टाळण्याकरिता पोलिसांनी सुमारे पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली.

नाशिक : पोलीस खात्याला भ्रष्टाचार नवीन नाही; मात्र चक्क तक्रारदाराकडून पोलीस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारण्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. सातपूर पोलीस ठाणे अंकित एका पोलिस चौकीत तिघा भ्रष्ट पोलिसांना लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

सातपूर पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वार संशयित तक्रारदाराला त्यांची अटक टाळण्याकरिता पोलिसांनी सुमारे पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर त्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज  केला विभागाने तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी करून खात्री केली असता तक्रारीत तथ्य आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सातपूर पोलिस चौकीत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सापळा रचला. यावेळी संशयित पोलीस नाईक हिरामण गणपत सोनवणे, सारंग एकनाथ वाघ, शिपाई राहुल पोपट गायकवाड या तिघांनी तक्रारदारकडून ठरल्याप्रमाणे 25 हजारांपैकी 13 हजाराची रक्कम स्वीकारली असता पथकाने रंगेहाथ मुसक्या आवळल्या. उर्वरित 12 हजारांची रक्कम बुधवारी स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. दरम्यान या तिघा संशयित लाचखोर पोलिसांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १९८८(संशोधन सन २०१८) च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरात अशाप्रकारे यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नारायण बापुनगर पोलीस चौकीत लाचेची रक्कम स्वीकारताना काही महिन्यांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र अशाप्रकारे एकाचवेळी तिघा पोलिसांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सुत्रांनी सांगितले. लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण महसूल व पोलीस खात्यात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईच्या आकडेवारिवरुन यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. काही ठराविक लाचखोर पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मालिन होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: ... Chukka accepted a bribe of Rs 13,000 at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.