३४०० रुपयांसाठी चुनू पोपलीची गोळी झाडून हत्या; मध्यरात्रीचा थरार, दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

By देवेंद्र पाठक | Published: August 6, 2022 12:47 PM2022-08-06T12:47:54+5:302022-08-06T12:50:58+5:30

केवळ ३ हजार ४०० रुपयांच्या उसनवारीतून हा प्रकार घडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

chunu popli shot dead for rs 3400 midnight thrill two arrested one absconding | ३४०० रुपयांसाठी चुनू पोपलीची गोळी झाडून हत्या; मध्यरात्रीचा थरार, दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

३४०० रुपयांसाठी चुनू पोपलीची गोळी झाडून हत्या; मध्यरात्रीचा थरार, दोघांना घेतले ताब्यात, एक फरार

googlenewsNext

देवेंद्र पाठक

धुळे: दोन दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी शिवीगाळ व मारहाण करीत गावठी कट्ट्यातून गोळी झाडत चंदन उर्फ चुनू राजेंद्र पोपली (४०) याला ठार मारले. ही घटना साक्री रोडवरील कुमार नगर भागात त्याच्या घराजवळच शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. पहाटे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच भटू चौधरी आणि यासीन पठाण या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक जण फरार आहे. दरम्यान, केवळ ३ हजार ४०० रुपयांच्या उसनवारीतून हा प्रकार घडला आहे, अशी माहिती उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.

शहरातील साक्री रोडवर कुमारनगर भागात चंदन उर्फ चुनू राजेंद्र पोपली (४०) हा घराजवळ असलेल्या चौकात इतरांसाेबत गप्पा मारत बसलेला होता. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास तीन जण दोन दुचाकीने आले. त्यांनी पोपली याच्या उसनवारी पैशांवरुन वाद घालून सुरुवात केली. शिवीगाळ करीत मारहाण झाल्याने झटापट झाली. त्यानंतर एकाने सोबत आणलेल्या गावठी कट्यातून त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. यात गंभीर जखमी झाल्याने आलेल्या तिघांनी दहशत माजवत तेथून पळ काढला. या घटनेनंतर तातडीने चुन्नू याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालय आवारात देखील काहीसा तणाव होता. घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. काही पुरावे मिळतात का याचा शोध घेण्यात आला.

याप्रकरणी पवन जितेंद्र गुडीयाल (वय २६, रा. कुमार नगर, साक्री रोड, धुळे) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पहाटे ५ वाजता भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल होताच भटू चौधरी आणि यासीन पठाण (दोघांचे पूर्ण नाव माहिती नाही) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तिसरा साथीदार हा फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: chunu popli shot dead for rs 3400 midnight thrill two arrested one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.