धक्कादायक! Instagram रिलने केला घात, चार तरुण तलावात बुडाले, तीन तासानंतर मृतदेह सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:42 AM2023-03-20T11:42:13+5:302023-03-20T11:42:50+5:30
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्स्टाग्रामसाठी रिल बनवत असताना चार तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राजस्थान येथील रामसरा गावात चार तरुण पोहोण्याचा रिल बनवत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. प्रशासनाच्या मदतीने गावकऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आणि सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांनी तरुणाचे मृतदेह बाहेर काढले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामसरा गावातील चार तरुण रुल बनवण्यासाठी तलावाच्या कठड्यावर चढले. यादरम्यान २१ वर्षीय सुरेश या तरुणाचा चालत असताना तोल गेल्याने तो बुडू लागला. सुरेशला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघे साथीदार खोल पाण्यात गेले, या दरम्यान त्यांचा बुडून मृत्यू झाला. रामसरा येथील सुरेश नायक (२१), योगेश रेगर (१८), लोकेश निमेल (१८) आणि कबीर सिंग (१८) यांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी उशिरापर्यंत रामसरा येथील रहिवासी जीतू प्रजापत, उमर प्रजापत, रणजित कडवसरा, ताराचंद प्रजापत, सुभाष, ओमप्रकाश नई आणि प्यारेलाल यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्यानंतर चार मृतदेह बाहेर काढले.
ऐश्वर्या रजनीकांतच्या घरी चोरी, पोलीस तक्रार; डायमंडसेटसह दागिने गायब
यावेळी तलावाच्या बाहेर असणाऱ्या तरुणाने गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी व तरुणाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.
या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते हरलाल सहारन, तहसीलदार धीरज झझाडिया, सीओ सिटी राजेंद्र बुरडक, पोलीस स्टेशन अधिकारी रतननगर जसवीर यांच्यासह सदर व रतननगरचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत भाजप नेते हरलाल सहारन म्हणाले की, अशा अपघातांमध्ये बचावासाठी प्रशासनाकडे कोणतेही साधन नाही. १०८ रुग्णवाहिकाही तासाभराने उशिरा पोहोचली, त्यावरून मृतदेह पिकअपने रुग्णालयात नेण्यात आला. यासोबतच चार मृतदेहही ग्रामस्थांनी बाहेर काढले.