लग्नाचं निमंत्रण देऊन येणाऱ्या तरूणीवर तलवारीने हल्ला, काही वेळाने आरोपीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 01:23 PM2021-07-01T13:23:17+5:302021-07-01T13:23:31+5:30
कुटुंबीयांनी सांगितलं की, पीडिता रोशनी स्वामी (१९) आणि तिच्या लहान बहिणीचं लग्न १८ जुलैला आहे. रोशनी, तिची बहीण आणि वडील शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देऊन घरी परतत होते.
राजस्थानच्या कुणसीसरमध्ये लहान बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण देऊन परतत असलेल्या तरूणीवर बुधवारी सायंकाळी दुचाकीस्वार तरूणाने तलवारीने वार केला. जखमी तरूणीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेच हल्ला करणाऱ्या तरूणाने काही वेळाने आत्महत्याही केली. प्राथमिक पाहणीत पोलिसांना हे प्रकरण प्रेमप्रसंगाचं दिसत आहे.
कुटुंबीयांनी सांगितलं की, पीडिता रोशनी स्वामी (१९) आणि तिच्या लहान बहिणीचं लग्न १८ जुलैला आहे. रोशनी, तिची बहीण आणि वडील शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देऊन घरी परतत होते. यावेळी गावातील तरूण जगदीश सिंह हातात तलवार घेऊन त्यांच्या दिशेने वेगाने आला. त्याने रोशनीवर तलवारीने जोरदार वार केले. या हल्ल्यात रोशनीच्या मानेवर आणि पाठीवर तीन मोठे घाव झाले. तर वार वाचवण्याचा प्रयत्न करत असताना तिचे तीन बोटेही तुटली.
कुटुंबीय धावत येताना पाहून तरूण तेथून पळून गेला. असं सांगितलं जात आहे की, रोशनी आणि तरूण जगदीश सिंहची बहीण गावातील एकाच शाळेत शिकत होत्या. अशात तरूणीची त्याच्यासोबत ओळख होते.
जखमी तरूणीला कुटुंबीय उपचारासाठी लगेच हॉस्पिटलमद्ये घेऊन गेले. घटनाक्रमानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी एक टीम तयार केली होती. मात्र, पोलीस त्याला पकडायला पोहोचले तेव्हा तरूणाने आधीच आत्महत्या केली होती. त्याने एका शेतातील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी डीएसपी ओमप्रकाश गोदारा म्हणाले की, तरूण जगदीश हा कुनसीसर गावातीलच आहे. ते म्हणाले की, कुंभदास स्वामीची मुलगी रोशनी आणि सरिताचं लग्न १८ जुलैला होणार आहे. वडील आपल्या दोन्ही मुलीला सोबत घेऊन शेजाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले होते. ते परत येत असताना बाइकवरून आलेल्या जगदीशने रोशनीवर तलावारीने हल्ला केला.